अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा भाजपला राजकीय दृष्ट्या फायदा झाला. पण, या लोकप्रियतेचा फायदा गुजरातमधील व्यापारीही मोठ्या खूबिने करून घेत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचा चक्क स्नॅक विकण्यासाठी वापर होताना दिसत आहे.
लोकप्रियतेचा वापर व्यावसायासाठी खूबिने करून घेणे हा कोणत्याही व्यावसायिकाचा महत्त्वाचा गुण. गुजरातमध्ये व्यापार ही तर परंपरेने मिळालेलेली देणगीच. त्यामुले गुजरातमधील व्यापाऱ्यांनी विशिष्ट व्यक्ति, वस्तू, व्यक्तिरेखा यांचा ब्रॅण्ड म्हणून वापर केला नाही तरच नवल. त्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी पंतप्रधान मोदींची प्रतिमाही वस्तू विकण्याचा ब्रॅण्ड म्हणून वापरायला सुरूवात केली आहे. म्हणूनच कदाचित अगदी स्नॅक्सच्या पाकिटांवरही मोदींच्या प्रतिमा दिसू लागल्या आहेत.
स्नॅक्स बनविणाऱ्या काही कंपन्यांनी आपल्या पॅकेटवर चक्क मोदींच्या प्रतिमा छापल्या आहेत. जसे की, एखादा ब्रॅण्ड छापावा. या पाकिटांवर लिहिलेली वाक्येही मोठी मजेशीर आहेत. 'मोदी का खजाना', 'मोदी का जादू', अशी अक्षरे या पाकीटावर दिसतात. या पॅकेटची किंमतही अगदी खिशाला परवडणारी असते.
गुजरातमधील अनेक व्यवसायीक, विक्रेते सांगतात की, व्यापारासाठी, वस्तू विकण्यासाठी नरेंद्र मोदी हा चांगला ब्रॅण्ड आहे. मोदींच्या ब्रॅण्डखाली काहीही विकले जाऊ शकते. जसे की, स्नॅक्स, गिफ्ट, लहान मुलांची खेळणी. कधी कधी नरेंद्र मोदींच्या प्रतिमेसोबत वस्तूंच्या पाकिटावर चलनी नोटांच्या प्रतिमाही छापलेल्या असतात.