एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झाली नाही ही देशाची ताकद - पंतप्रधान मोदी

१२५ जागांवर एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.  

Updated: Nov 11, 2020, 09:03 PM IST
एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झाली नाही ही देशाची ताकद - पंतप्रधान मोदी title=

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्ते दिल्ली कार्यालयात जल्लोष साजरा करत आहेत. बिहार निवडणूक मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणी प्रक्रियेनंतर अखेर एनडीएने बाजी मारली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार मानत देशातील जनतेला संबोधित केले. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. १२५ जागांवर एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे एनडीए कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले 'यंदा झालेली निवडणूक ही सोपी नव्हती. मात्र संपूर्ण जगाला आपण आपली ताकद दाखवली आहे. महत्त्वाचं म्हणजे एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झाली नाही हीच देशाची खरी ताकद आहे.' असं म्हणत मोदींनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विजयाचं श्रेय दिलं. त्याचप्रमाणे  ‘जे पी नड्डाजी आगे बढो, हम आपके साथ है’ अशी घोषणाही दिली.
 
शिवाय बिहारमध्ये सत्याचा विजय झाला असं देखील मोदी म्हणाले. बिहार हे सर्वात खास आहे कारण बिहारमध्ये सत्याचा विजय आहे. बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे जनतेने लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातवरण असल्याचं देखील ते म्हणाले. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले

विधानसभा निवडणूक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली कार्यालयाबाहेर जनतेला संबोधित केलं.  दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांना तुफान गर्दी केली. यावेळी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते