...आधी हे वाचा नंतरच सेकंड हँड मर्सिडीज घ्या

मारूती सुझुकी बॅलेनो फेरबदल करून मर्सिडीज बेन्झ ए-क्लास म्हणून विकण्यात आलीय.

Updated: Dec 10, 2017, 02:22 PM IST
...आधी हे वाचा नंतरच सेकंड हँड मर्सिडीज घ्या title=

तिरुअनंतपूरम : मारूती सुझुकी बॅलेनो फेरबदल करून मर्सिडीज बेन्झ ए-क्लास म्हणून विकण्यात आलीय.

मर्सिडीजचा आभास

केरळमध्ये मारूती सुझुकी बॅलेनोला मर्सिडीजच्या नावाने विकण्याचा प्रकार घडलाय. बॅलेनोचा पुढचा भाग, हेड लाईट, पाठीमागच्या बाजूचे लाईट, लोगो आणि इतर काही दर्शनी भाग हुबेहुब मर्सिडीजसारखे करण्यात आले. म्हणजे बघताक्षणी ती कार म्हणजे मर्सिडीज असल्याचा आभास निर्माण होईल. सेकंड हँड मर्सिडीज म्हणून ती विकण्यात आली. 

बॅलेनो अत्यंत लोकप्रिय कार

बॅलेनो ही 2015 मध्ये लाँच केल्यापासून अत्यंत लोकप्रिय कार आहे. ही कार तिच्या स्टाईलीश लूकसाठी प्रसिद्ध आहे. या कारसाठी नोंदणी करून वाटही बघावी लागायची. अशीच एक लाल रंगाची बॅलेनो कार फेरबदल करून चक्क मर्सिडीज म्हणून विकण्यात आलीय.

ट्विटरवर मात्र कौतुक

विशेष म्हणजे या मारूती सुझुकी बॅलेनोची किंमत 8.55 लाख आहे. तर मर्सिडीज बेन्झ ए-क्लासची किंमत 27.53 लाख आहे. 
गंमत म्हणजे ट्विटरवर मात्र अनेकांनी फसवणूक असूनसूद्धा या डिझाईनचं कौतुक केलयं. पण तुम्ही मात्र सेकंड हँड मर्सिडीज विकत घेणार असाल तर खात्री करूनच कार घ्या.