पुन्हा दरवाढ, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

 पेट्रोल आणि डिझेचलच्या वाढत्या दरांनी आता सर्वांनाच घाम फुटू लागला आहे.

ANI | Updated: Oct 8, 2018, 08:57 AM IST
पुन्हा दरवाढ, जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

मुंबई: पेट्रोल आणि डिझेचलच्या वाढत्या दरांनी आता सर्वांनाच घाम फुटू लागला आहे. एकिकडे काही दिवसांपूर्वीच शासनाने हे दर कमी केल्याचं भासवलं होतं. तर दुसरीकडे मात्र या नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच, म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं वृत्त समोर येत आहे. दिल्लीसह मुंबईतही ही वाढ पाहायला मिळाली. 

मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये २१ पैशांनी वाढ झाली असून आता हे दर ८७.५० रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. तर, डिझेलच्या दरांमध्ये ३१ पैशांनी वाढ झाल्यामुळे हे दर ७७.३७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. 

दिल्लीमध्ये २१ पैशांच्या वाढमुळे प्रति लीटर पेट्रोलसाठी ८२.०३ रुपये मोजावे लागत आहेत. तर, डिझेलच्या दरांमध्ये २९ पैशांची वाढ झाल्यामुळे हे दर प्रति लीटर ७३.८२ पैशांवर पोहोचले आहेत.  

रविवारीसुद्धा दिल्ली आणि मुंबईतील पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान येत्या काळात या दरांमध्ये पाच रुपयांनी घट होणार असंही सांगण्यात आलं होतं.