पत्नीने पतीचं गुप्तांग कापल्यानंतर केली हत्या... पोलिसांत तक्रार दाखल केली पण शेवटी अडकलीच

Crime News : मध्य प्रदेशात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून रस्त्याच्या बाजूला फेकून दिला होता. यानंतर पत्नीने स्वतः पोलिसात जाऊन याबाबत अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे

Updated: Mar 4, 2023, 05:02 PM IST
पत्नीने पतीचं गुप्तांग कापल्यानंतर केली हत्या... पोलिसांत तक्रार दाखल केली पण शेवटी अडकलीच title=

Crime News : अनेकदा आपण पतीकडून पत्नीचा (Wife) छळ केल्याच्या बातम्या असतील. कधी कधी याचे गंभीर गुन्ह्यांमध्येही रुपांतर होताना पाहिलं असेल. पण पत्नीने पतीचा छळ केल्याचे क्वचितच ऐकलं असेल किंवा समोर आले असेल. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशात (MP Crime) घडलाय. एका महिलेने आपल्या पतीच्या खासगी भागावर  कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या (wife killed her husband) केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (MP Police) या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पतीच्या छळाला कंटाळून (harrassment) पत्नीने कुऱ्हाडीने त्याचे गुप्तांग कापून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार मध्य प्रदेशातील सिंगरौलीमध्ये घडलाय. धक्कादायक बाब म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर पत्नीनेच पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी तपास करत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. वीरेंद्र गुर्जर असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच लग्ने केली होती. त्याची पाचवी पत्नी कांचन गुर्जर हिनेच वीरेंद्रला ठार मारलं आहे. मात्र त्याआधी त्याचे गुप्तांग कापून फेकून दिलं. पोलिसांनी कांचन गुर्जरला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली आहे.

उर्ती गावात 21 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासानंतर तो वीरेंद्र गुर्जरचा असल्याचे समोर आले होते. वीरेंद्रच्या मृतदेहावर आणि खासगी भागावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. पोलिसांनी वीरेंद्रचा मृतदेह ताब्यात घेऊन या हत्येचा तपास सुरु केला. पतीच्या हत्येप्रकरणी कांचन गुर्जनेही पोलिसांता अज्ञात इसमाविरोधात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी वीरेंद्र गुर्जरच्या नातेवाईंकडे आणि जवळच्या व्यक्तींकडे चौकशी सुरु केली. पोलिसांनी कांचनवर संशय बळावला आणि त्यांनी तिची कसून चौकशी केली. शेवटी कांचनचा धीर सुटला आणि तिने वीरेंद्रची हत्या केल्याची कबुली दिली.

का केली हत्या?

वीरेंद्र गुर्जरचे याआधी चार विवाह झाले होते. वीरेंद्रला दारुचे व्यसन होते आणि त्यातूनच तो पत्नीचा छळ करायचा. याच त्रासाला कंटाळून आधीच्या चार पत्नींनी वीरेंद्रला सोडले होते. त्यानंतर त्याने कांचनसोबत लग्न केले. मात्र कांचनचाही तो अशाच प्रकारे छळ करु लागला. याच छळाला कंटाळून कांचनने संतापाच्या भरात वीरेंद्रची निर्घृणपणे हत्या केली.

कशी केली हत्या?

21 फेब्रुवारीच्या रात्री कांचनने वीरेंद्रच्या जेवनात झोपेच्या तब्बल 20 गोळ्या टाकल्या होत्या. या गोळ्यांमुळे वीरेंद्र गाढ झोपी गेला. झोपतेच कांचचने त्याची हत्या केली. पती बेशुद्ध झाल्यावर कांचचने त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचे गुप्तांग कापून टाकले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. हत्येनंतर कांचनने वीरेंद्रचा मृतदेह चादरीत गुंडाळून रस्ताच्या कडेला फेकून दिला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे कपडे आणि चप्पलही जाळून टाकली.