Mukesh Ambani Resigns: मुकेश अंबानींनी दिला JIO च्या संचालकपदाचा राजीनामा; आता जबाबदारी...

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

Updated: Jun 28, 2022, 05:35 PM IST
Mukesh Ambani Resigns: मुकेश अंबानींनी दिला JIO च्या संचालकपदाचा राजीनामा; आता जबाबदारी... title=

Reliance Jio: मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच आकाश अंबानी यांची रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने मंगळवारी ही माहिती दिली. नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवताना या नियुक्तीकडे पाहिले जात आहे.

27 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतरच मुकेश अंबानी यांचा हा राजीनामा वैध ठरला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आकाश अंबानी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

जिओच्या 4G इकोसिस्टमच्या स्थापनेचे बरेच श्रेय आकाश अंबानी यांना जाते. 2020 मध्ये, जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली होती. आकाश अंबानी यांनी देखील भारतात जागतिक गुंतवणूक आणण्यासाठी कठोर परिश्रम केले होते.