मटन, चिकन, कोळंबी फ्लेवर; पाणीपुरीचा नॉन व्हेज मेन्यू पाहून खवय्ये भडकले

काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरी मार्केमध्ये आली होती. आता नॉनव्हेज पाणीपुरीचा मेन्यू व्हायरल होत आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 15, 2023, 10:07 PM IST
मटन, चिकन, कोळंबी फ्लेवर; पाणीपुरीचा नॉन व्हेज मेन्यू पाहून खवय्ये भडकले title=

Non Veg Panipuri : पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं.  पाणीपुरीचा ठेला दिसला की आपोआपच पावलं थांबतात. पाणीपुरी आवडत नाही असं क्वचितच कुणीतरी सापडेल. पाणीपुरी मध्ये फार व्हरायटी नसतात. तिखट पाणीपुरी, गोड पाणीपुरी, रगडा ऐवजी खारी बुंदी एवढेच काय ते प्रकार असतात. सध्या, मात्र सोशल मीडियावर नॉनव्हेज पाणीपुरी  व्हायरल होत आहे. चिकन आणि मटन अशा फ्लेवर मध्ये हे पाणीपुरी आहे. पाणीपुरीचे हे नॉनव्हेज फ्लेवर पाहून पाणीपुरीचे चाहते चांगलेच संतापले आहेत. पाणीपुरीच्या या नॉनव्हेज मेन्यूवर चित्र विचित्र कमेंट्स येत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ही नॉन व्हेज पाणीपुरी विकली जात आहे. @Rituparna Chatterjee नावाच्या ट्विटर हँडलवरुन या नॉन व्हेज पाणीपुरीचे मेन्यू कार्ड शेअर केले आहे. रितूपर्णा नावाच्या महिलेने हे ट्विट केले आहे. रितूपर्णा यांनी या नॉन व्हेज पाणीपुरीचे मेन्यू कार्डचा फोटोच ट्विट केला आहे. 

पाणीपुरीवर अत्याचार

रितूपर्णा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या नॉन व्हेज पाणीपुरीच्या मेन्यू कार्डच्या फोटोवर खवय्यांनी चित्र विचित्र कमेंट्स केल्या आहेत. काही खवय्ये चांगलेच भडकले आहेत. हा पाणी पुरीवर अत्याचार आहे. खाद्य पदार्थांसोबत असे न पटणारे प्रयोग थांबवा अशी मागणी देखील चाहते कमेंटमध्ये करत आहे. चिकन, मटनची ही पाणीपुरी बोनलेस आहे का? प्रश्न देखीय खवय्ये विचारत आहेत. रितूपर्णा यांच्या पोस्टवर 55 हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.

 

कस आहे हे नॉन व्हेज पाणीपुरीचे मेन्यू कार्ड?

एका फूड स्टॉल बाहेरचा हा फोटो आहे. या  स्टॉल बाहेर मोठ्या बोर्डवर  नॉन व्हेज पाणीपुरचे मेन्यू कार्ड लावण्यात आले आहे. या स्टॉलवर चिकन, मटन आणि कोळंबी फ्लेवरमध्ये पाणीपुरी मिळते. याशिवाय चॉकलेट, दही तसेच विविध फ्लेवरमध्ये येथे पाणीपुरी उपलब्ध आहे.