'माझे आदर्श नथुराम गोडसे'... या विषयावर भाषणात त्याने पटकावला पहिला नंबर

'माझे आदर्श नथुराम गोडसे'... या विषयावर बोलणाऱ्या विद्यार्थ्यानं पटकावला पहिला क्रमांक मात्र स्पर्धेचा विषय ऐकून स्थानिकांमध्ये गोंधळ आणि संताप कारण...

Updated: Feb 17, 2022, 02:44 PM IST
'माझे आदर्श नथुराम गोडसे'... या विषयावर भाषणात त्याने पटकावला पहिला नंबर title=

वलसाड : महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसेवरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. गुजरातच्या वलसाड भागातील एका शाळेत वाद-विवाद स्पर्धेमधील एका विषयावरून हा वाद उफाळून आला आहे. वाद विवाद स्पर्धेत 3 पैकी एक विषय 'माझे आदर्श नथुराम गोडसे (My Ideal Nathuram Godse)' असा विषय चर्चेसाठी देण्यात आला होता. सोमवारी झालेल्या या वाद-विवाद स्पर्धेवरून वाद झाला आहे. 

ह्या विषयावर बोलणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं. विद्यार्थ्याने नथुराम गोडसे कसा बरोबर होता आणि महात्मा गांधी कसे चुकीचे होते यावर त्याने विषय मांडला. यावेळी बोलताना गांधीजींबद्दल अनेक वाईट गोष्टी त्याने मांडल्या. यावरून गुजरातमध्ये गोंधळ झाला आणि कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. 

या सगळ्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार 5 वी ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा स्थानिक पातळीवर सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. नथुराम गोडसे विषय आल्यानंतर तिथे गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर वलसाड जिल्हा अधिकारी मीताबेन गवळी यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलं आहे. या सगळ्या प्रकरणी जेव्हा सुम विद्यालयाच्या संचालकांकडून माहिती घेतली तेव्हा त्यांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला. 

या संपूर्ण वाद-विवाद स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून करण्यात आलं होतं. आम्ही फक्त आमच्या शाळेची जागा दिल्याचा दावा कुसुम विद्यालयानं केला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी या विषयाबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती अशी माहितीही संचालकांनी दिली आहे. 

या स्पर्धेमध्ये तीन विषय आयोजिक करण्यात आले होते त्यापैकी एक My Ideal Nathuram Godse असा होता. गेल्या वर्षी गुजरातमध्ये नथुराम गोडसेची मूर्ती बसवण्यावरून मोठा वादविवाद झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. 

यासोबत आणखी उत्तम आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आजच डाऊलोड करा Zee 24 taas App
http://onelink.to/xuur2f