महागाईचा भडका : CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले, शहरांचे दर जाणून घ्या

CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे.

Updated: Oct 13, 2021, 07:46 AM IST
महागाईचा भडका : CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले, शहरांचे दर जाणून घ्या title=

मुंबई : CNG Prices Increased : महागाईचा आणखी एक फटका नागरिकांना बसणार आहे. बुधवारपासून राजधानीत सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असून आता दिल्लीत सीएनजीचा दर 49.76 रुपये प्रति किलो असेल. ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आणि उपनगर शहरांत 54.57 रुपये प्रति किलो दर आहे. आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलप्रमाणे डिझेलही शंभरी पार झाले आहे. त्यामुळे महागाईला सामोरे जाणाऱ्या सामान्य जनतेच्या खिशावर एक नवा बोजा पडणार आहे. (Natural gas - CNG prices increased for the second time in October in Delhi

महानगर गॅसने (Mahanagar Gas) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) मूळ किंमतीत दोन रुपये किलो आणि घरगुती पाईप केलेले नैसर्गिक वायू (PNG) दोन रुपयांनी मुंबईत आणि आसपास 54.57 रुपये प्रति किलो आणि 32.67 रुपये/SCM. महानगर गॅस असणार आहे. हा दर 5 ऑक्टोबरचा आहे. आता दिल्लीत CNGचे दर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा वाढले आहेत. याचा फटका दिल्ली-एनसीआरमधील लोकांना बसणार आहे. 

सकाळी 6 पासून नवीन दर लागू

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून सीएनजी 49.76 रुपये प्रति किलो उपलब्ध होईल. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत सीएनजीची किंमत 49.76 रुपये प्रति किलो असेल असे कंपनीने ट्विट केले आहे. 12 दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

त्याचवेळी, सीएनजी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 56.02 रुपये आणि गुरुग्राममध्ये 58.20 रुपये प्रति किलोवर उपलब्ध होईल. मुझफ्फरनगरमध्ये सीएनजीची किंमत 63.28 रुपये प्रति किलो आहे, तर शामली, मेरठमध्ये सीएनजीची किंमत 63.28 रुपये प्रति किलो आहे. कानपूर, फतेहपूर येथे सीएनजीची किंमत 66.54 रुपये प्रति किलो आहे. त्याचबरोबर हमीरपूरमध्ये सीएनजीची किंमत 66.54 रुपये प्रति किलो आहे.

PNG च्या किंमतीत बदल

सीएनजी व्यतिरिक्त, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. नवीन दरानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये 35.11 प्रति एससीएम दराने गॅस उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त, ही किंमत गुरुग्राममध्ये 33.31 प्रति एससीएम दराने उपलब्ध असेल.

यापूर्वी 2 ऑक्टोबरला देखील सीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत सीएनजीच्या किंमतीत 2.28 रुपये आणि नोएडा-गाझियाबादमध्ये 2.55 रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली. यापूर्वी नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्के वाढ करण्यात आली होती. यासोबतच सीएनजी, पीएनजी महाग होण्याची शक्यता व्यक्त होत होती.