इंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा; संपर्कासाठी ऑफलाईन चॅटचा वापर

इंटरनेट बंदी आधीचा आणि नंतरच्या काळाची तुलना केल्यास हा फरक स्पष्टपणे दिसून येतो.

Updated: Dec 22, 2019, 11:39 AM IST
इंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा; संपर्कासाठी ऑफलाईन चॅटचा वापर title=

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship amendment) दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून प्रशासनाकडून दिल्लीच्या अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. मात्र, आंदोलकांनी यावरही उपाय म्हणून हॉगकाँग पॅटर्नचा अंमलात आणला आहे. त्यानुसार आंदोलक ब्रिजफाय आणि फायरचॅट यासारख्या ऑफलाईन चॅटिंग अॅप्सचा वापर करताना दिसत आहेत. 

या दोन्ही अॅप्समुळे मोबाईलमधील ब्लू-टुथचा वापर करून स्वतंत्र नेटवर्क तयार करता येते. त्यामुळे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची गरज उरत नाही. १२ डिसेंबरला आसाम आणि मेघालयात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली तेव्हापासून ब्रिजफाय अॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण ८० पटीने वाढले आहे. 

CAA विरोधी आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त

इंटरनेट बंदी आधीचा आणि नंतरच्या काळाची तुलना केल्यास हा फरक स्पष्टपणे दिसून येतो. भारतात आतापर्यंत दिवसाकाठी सरासरी २५ जण ही अॅप्स डाऊनलोड करत होते. मात्र, १२ डिसेंबरपासून दिवसाकाठी ब्रिजफाय डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या १०० पटीने वाढून २,६०९ इतकी झाली आहे. तसेच ब्रिजफायच्या डेली अॅक्टिव्ह युजर्समध्येही ६५ पटीने वाढ झाली आहे. 

CAA protes: पोलिसाच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये गोळी घुसली पण पाकिटामुळे जीव वाचला

तर फायरचॅटचा वापर आणि डाऊनलोडचे प्रमाण अनुक्रमे ९ आणि १८ पटीने वाढले आहे. फायरचॅटचा युजरबेस तुर्तास कमी असला तरी आंदोलनाची धग वाढत असताना युजर्सच्या संख्येत भर पडत आहे, अशी माहिती ऐपोटॉपिया या अमेरिकन अॅप इंटेलिजन्स संस्थेने दिली आहे.