जगभरात नव्या व्हायरसनं झोप उडवली; बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका

बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. 

Updated: Jul 15, 2023, 10:25 PM IST
जगभरात नव्या व्हायरसनं झोप उडवली; बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका  title=

Bird Flu Virus : जगभरात आता एका नव्या व्हायरसनं झोप उडवली आहे. बर्ड फ्लूच्या नव्या धोकादायक स्ट्रेनचा मानवाला धोका निर्माण झाला आहे.  H5N1असं या व्हायरसचं नाव आहे. हा नवा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य असल्याचं जागतीक आरोग्य संघटनेनं (WHO-World Health Organization) सांगीतलंय. हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली आहे. 

बर्ड फ्लू माणसांमध्ये सहज पसरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना स्पर्श करून, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यावर आणि संक्रमित प्राणी आणि पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोल्ट्रीफार्ममध्ये विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सस्तन प्राणी इन्फ्लूएंझा विषाणूच्या मिश्रणाचे काम करू शकतात. यातून नवीन विषाणूही तयार होऊ शकतात. हे प्राणी आणि मानव दोघांसाठीही अधिक घातक ठरू शकतात असा इशारा देखील देण्यात आला आहे. 

10 देशांमध्ये  बर्ड फ्लूचा उद्रेक

2022 पासून दहा देशांमध्ये प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. असे आणखी बरेच देश असण्याची शक्यता आहे जिथे त्याचा प्रादुर्भाव अद्याप सापडलेला नाही असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ग्रेगोरियो टोरेस यांनी सांगितले. बर्ड फ्लूची लक्षणे बहुतेक प्रकरणांमध्ये मानवांमधील सामान्य इन्फ्लूएंझाच्या लक्षणांसारखीच असतात. नाक वाहणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि थकवा यांचा समावेश असू शकतो. काही प्रकरणांमध्ये हा संसर्गजन्य रोगाची तीव्रता वाढू शकते. रुग्ण दगावू देखील शकतो.  विशेषत: वृद्ध लोकांमध्ये आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांना याचा धोका अधिक आहे.

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ

नवी मुंबईत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ झाली आहे. ताप , अतिसार, उलट्या , आणि त्वचा शुष्क पडणे ही लक्षणे आढळून येत आहेत. तसेच जुलैमध्ये डेंग्यूचे 23 संशयित रुग्ण आढळले आहेत.