धक्कादायक : 2 दिवसाच्या मुलीला कमोडमधून केलं फ्लश

मुलींवर होणाऱ्या पाशवी अत्याचाराचे पडसाद देशभर पडत असताना पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, या देशात कोणतीच स्त्री सुरक्षित नाही. अगदी जन्मजात मुलीवर देखील अत्याचार होत असल्याच समोर आलं आहे. एका 2 दिवसाच्या नकोशीवर अमानुष प्रकार घडला आहे. 

धक्कादायक : 2 दिवसाच्या मुलीला कमोडमधून केलं फ्लश

मुंबई : मुलींवर होणाऱ्या पाशवी अत्याचाराचे पडसाद देशभर पडत असताना पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, या देशात कोणतीच स्त्री सुरक्षित नाही. अगदी जन्मजात मुलीवर देखील अत्याचार होत असल्याच समोर आलं आहे. एका 2 दिवसाच्या नकोशीवर अमानुष प्रकार घडला आहे. 

केरळात एका डॉक्टरच्या क्लिनिकच्या कमोडमध्ये चक्क 2 दिवसाच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. कमोडमध्ये फ्लश होत नसल्याकारणाने प्लंबरला बोलवण्यात आले. यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

कसा लक्षात आला प्रकार 

टॉयलेटमध्ये पाणी साचू लागलं. ते ब्लॉक झाल्याने डॉक्टरांनी प्लंबरला बोलावले. त्यावेळी सफाई दरम्यान कमोडच्या पाईपमध्ये नवजात मुलीचे डोके दिसले. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. डॉक्टर अब्दुल रहमान आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी पेरिंथामन्ना आपल्या घरातच क्लिनिक चालवतात. क्लीनिकच्या साफ-सफाईदरम्यान घरातील मोलकरणीने क्लीनिकमधले टॉयलेट ब्लॉक झाल्याचे पाहिजे. त्यात पाणी साचले होते. मोलकरणीने ही बाब डॉक्टरांना सांगितली. यावर डॉक्टरांनी प्लंबरला बोलावले. प्लंबरने सफाई करणे सुरू केले तेव्हा कमोडमध्ये दोन दिवसांच्या नवजात मुलीचे अडकलेले डोके दिसले.

कमोडमध्ये कुणी फ्लश केलं 'नकोशी'ला? 

 मुलीचा मृतदेह 13 एप्रिल रोजी आढळला होता. प्राथमिक चौकशीवरून असे वाटत आहे की, क्लीनिकमध्ये आलेल्या एखाद्या महिलेने नवजात मुलीला टॉयलेटमध्ये फ्लश केले असेल. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस डॉक्टरांचीही चौकशी करत आहेत की, मागच्या काही दिवसांत त्यांच्या क्लिनिकमध्ये कोण-कोण आले होते आणि त्यापैकी किती जणांकडे प्रेग्नेंसी डेट होती. सध्या याप्रकरणी कुणालाही अटक झालेली नाही.