एनआयएने ४ हुर्रियत नेत्यांना केली अटक

एनआयए गिलानी यांच्यासह ३ हुर्रियत नेत्यांना केली ताब्यात घेतलं आहे. दहशतवाद्यांकडून फंड घेतल्याच्या प्रकरणात अटक केल्याचं बोललं जातं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआयएने मंगळवारी रात्री ही मोठा कारवाई केली आहे. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी याच्यांसह त्याचे जावई मेहराज कलवल आणि अयाज अकबर यांना ताब्यात घेतलं आहे. श्रीनगरमध्ये राजबाग पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आलं आहे. 

Updated: Jun 28, 2017, 10:32 AM IST
एनआयएने ४ हुर्रियत नेत्यांना केली अटक title=

श्रीनगर : एनआयए गिलानी यांच्यासह ३ हुर्रियत नेत्यांना केली ताब्यात घेतलं आहे. दहशतवाद्यांकडून फंड घेतल्याच्या प्रकरणात अटक केल्याचं बोललं जातं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि एनआयएने मंगळवारी रात्री ही मोठा कारवाई केली आहे. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी याच्यांसह त्याचे जावई मेहराज कलवल आणि अयाज अकबर यांना ताब्यात घेतलं आहे. श्रीनगरमध्ये राजबाग पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आलं आहे. 

एनआयएने याआधी देखील त्यांची चौकशी केली होती. यापूर्वी एनआयएने २९ ठिकाणी छापेमारी केली होती. गिलानीचे आणखी एक नेते पीर सैफुल्लाह याला अटक करण्यासाठी देखील त्याच्या घरी पोहोचले पण त्याआधीच तो तेथून फरार झाला होता. याआधी एनआयएने तिघांच्या घरी छारेमारी करत त्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलवले होते.