'इसिस'च्या नव्या नवं मॉड्युलचा खुलासा, पाच जण NIA च्या ताब्यात

इसिसच्या नव्या मॉड्युलविषयी अधिक माहिती मिळवण्याचा एनआयएचा प्रयत्न 

Updated: Dec 26, 2018, 12:14 PM IST
'इसिस'च्या नव्या नवं मॉड्युलचा खुलासा, पाच जण NIA च्या ताब्यात  title=

नवी दिल्ली : बुधवारी सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून राजधानी दिल्लीसहीत उत्तर प्रदेशच्या १६ जागांवर छापेमारी सुरू आहे. या दरम्यान, दिल्ली-उत्तरप्रदेशात दहशतवादी संघटना इसिसचं नवं मॉड्युल 'हरकत उल हर्ब-ए-इस्लाम'चा खुलासा झालाय. त्यानंतर एनआयएच्या तपासानं वेग घेतलाय. 

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जागांवर मारलेल्या छाप्यानंतर पाच संदिग्ध व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, या संदिग्धांकडे एनआयएची एक टीम चौकशी करत आहे. इसिसच्या नव्या मॉड्युलविषयी अधिक माहिती मिळवण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, दहशतवादी जाकिर मूसा हा उत्तरप्रदेशातल्या अमरोहा जिल्ह्यामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यानंतर एनआयए, पोलीस आणि एटीएची एक संयुक्त टीम कारवाई करत आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्टही जारी करण्यात आलाय.