तामिळनाडूत एका मंदिर उत्सवात 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले आहेत. विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात लिंबूंचा लिलाव करण्यात आला. मंदिरातील देवतेच्या पवित्र भाल्यावर खोचण्यात आलेल्या या लिंबूचे सेवन केल्यानं वंध्यत्व दूर होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच हे लिंबू विकत घेण्यासाठी भाविकांनी हजारो, लाखो रुपये मोजले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
विल्लुपुरममधील भगवान मुरुगाच्या मंदिराचं व्यवस्थापन वार्षिक पांगुनी उत्तरम उत्सवादरम्यान लिंबांचा लिलाव करतात. यावेळी मूल होण्याची इच्छा असणारे किंवा प्रत्न करणारे लिलावात हे लिंबू खरेदी करण्यासाठी पोहोचत असतात. हा उत्सव एकूण 9 दिवसांचा असतो. उत्सवाच्या पहिल्या भाल्यावर लावलेला लिंबू सर्वांत शक्तिशाली असल्याची भक्तांची श्रद्धा आहे. एका जोडप्याने हा लिंबू विकत घेण्यसााठी 50 हजार 500 रुपये मोजले.
रिपोर्टनुसार, 9 दिवस चालणाऱ्या मंदिर उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पुजारी देवतेच्या भाल्यावर एक लिंबू लावतात. एका गावकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे लिंबू मिळवण्यासाठी येणाऱ्यांमध्ये फक्त मुलाची इच्छा असणारी जोडपी नसतात. यात व्यावसायिक, व्यापारीही असतात. लिंबूमुळे आपलं नशीब उजळण्याची आशा असल्याने तेदेखील या लिलावात भाग घेतात.
जे लोक लिंबू विकत घेतात त्यांना इच्छा पूर्ण होण्यासाठी पुजारीसमोर गुडघे टेकून पवित्र स्नान करावे लागते. 2018 मध्ये, तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात मंदिर उत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या लिलावात लिंबूवर 7600 रुपयांची बोली लावण्यात आली होती. हे लिंबू महाशिवरात्री उत्सवादरम्यान पाजथिन्नी करुपन्नन मंदिरात लिलावासाठी ठेवण्यात आले होते.
लिंबूला वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये महत्व आहे. अनेकदा पवित्रता, शुद्धीकरण आणि विविध संस्कृतींमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं प्रतीक म्हणून लिंबूची ओळख आहे. भारतातील अनेक भागांमध्ये, लिंबू आणि हिरवी मिरची दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी दरवाजावर आणि वाहनांच्या आत टांगल्या जातात. काळ्या जादूतही लिंबूचा वापर केला जातो.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, महाराष्ट्रात उल्हासनगरमध्ये नागरी संस्थेत काम करणाऱ्या एका शिपायावर सहाय्यक महापालिका आयुक्तांच्या गाडीखाली लिंबू ठेवल्याच्या आरोपाखाली अंधश्रद्धा आणि काळी जादू विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.