नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय तेल बाजारात किंमती वाढल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्ली देखील पेट्रोलचे दर गेल्या 4 वर्षाच्या सर्वोतम किंमतीवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल 73.83 रुपये लीटर, तर डिझेल 64.69 रुपयांवर पोहोचलं आहे. पण सरकारकडून तरी अजून कोणताही दिलासा मिळेल असं दिसत नाही. उत्पादन शुल्कात कोणतीही घट करण्याच्या तयारीत सरकार दिसत नाही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोतम स्तरावर पोहोचले आहेत.
मोदी सरकारने वैश्विक बाजारात भाव कमी झाल्यानंतर ही सरकारच्या तिजोरीतील कमतरता भरुन काढण्यासाठी नोव्हेंबर 2014 पासून जानेवारी 2016 पर्यंत 9 वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. मागच्या वर्षी एकदा मात्र २ रुपये सरकारने कमी केले होते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारांमध्ये दर वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
दूसऱ्यांदा पुन्हा उत्पादन शुल्कात बदल केला जाणार का याबाबत वित्त सचिव हसमुख अढिया यांनी म्हटलं की, सध्या नाही. जेव्हा आम्ही याबाबत विचार करु तेव्हा याची माहिती दिली जाईल. याआधी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं की, सरकार पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवर नजर ठेवून आहे. पेट्रोल आणि डिझेल लवकरच जीएसटी अंतर्गत आणलं जाईल ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.