नवी दिल्ली : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी म्हटलं की, राजीनामा देण्याआधी मी माझं मत समोर ठेवलं होतं. महाआघाडी टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण माझ्याकडे आघाडी तोडण्याऐवजी दुसरा कोणताही दुसरा पर्याय नव्हता.
नितीश कुमारांनी पुढे म्हटलं की, दिल्लीच्या खुर्चीवर पंतप्रधान मोदी यांच्या शिवाय दुसरा कोणी नाही बसू शकत. २०१९ मध्ये मोदींचा सामना करण्याची क्षमता कोणामध्येच नसेल.
आरजेडीचे वक्तव्यांमुळे महाआघाडी तुटली. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका देखील केली. लालू हे तेजस्वी यादव यांच्यावर काही बोलले नाही म्हणून महाआघाडी तोडण्याचा निर्णय बिहारच्या जनतेच्या हितासाठी घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबावर सीबीआयने कारवाई केल्याच्या मुद्दयावर नितीश कुमार यांनी म्हटलं की, 'सीबीआयच्या रेडनंतर मी अनेकदा लालू यादव यांच्याशी बोललो. सीबीआयच्या कारवाईवर लालू यादव यांनी भाजपला नवा पार्टनर मिळाल्याचं म्हणत धन्यवाद म्हटलं. ज्याचा खूप चुकीचा संदेश गेला.'