TATA, Birla, Ambani नव्हे 'हे' आहे भारतातील सर्वाज जुनं उद्योजक कुटुंब; ब्रिटीशांसाठीही केलं काम

Indian Business Sector : TATA, Birla, Ambani तर नंतर आले... 'या' कुटुंबानं रचला भारतीय उद्योग जगताचा पाया; नाव जाणून वाटेल आश्चर्य   

सायली पाटील | Updated: Jul 10, 2024, 02:54 PM IST
TATA, Birla, Ambani नव्हे 'हे' आहे भारतातील सर्वाज जुनं उद्योजक कुटुंब; ब्रिटीशांसाठीही केलं काम  title=
Not tata birla or ambani wadia group is the oldest business family in india know their history

Indian Business Sector : भारतीय उद्योगजगताचा प्रवास फार वर्षांपूर्वीच सुरु झाला. आजच्या घडीला उद्योगजगताचं नाव निघालं की अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला या अशा कुटुंबांची चर्चा होते. त्यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाविषयी बोललं जातं. पण, या यादीतील सर्वात जुन्या, किंबहुना सर्वात मानाच्या नावाला विसरून चालणार नाही. ज्या काळातील उद्योगाची नोंदही नाही, अशा काळापासून या कुटुंबाची उद्योग जगतातील पाळंमुळं पाहायला मिळतात असं सांगितलं जातं. तुम्हाला माहितीये का, देशातील सर्वात जुना उद्योगसमुह कोणत्या कुटुंबानं नावारुपास आणला? 

भारतात उद्योगाची संकल्पना जन्माला आली त्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये एका कुटुंबानं महत्त्वाची कामगिरी करत कैक क्षेत्रांमध्ये भरीव योगदान दिलं. हे कुटुंब म्हणजे, वाडिया समुह (Wadia Group). जवळपास 300 वर्षांपूर्वी म्हणजेच 1736 मध्ये उद्योग क्षेत्रात सक्रिय झालं त्या क्षणापासून या समुहानं कधीच मागं वळून पाहिलं नही. लोएजी नुसरवानजी वाडिया यांनी या उद्योगसमुहाचा पाया रचला आणि आज जगभरात या उद्योगसमुहानं नावलौकिक आहे. बिस्किटांपासून एविएशन क्षेत्रापर्यंत व्याप्ती केलेल्या या समुहाची सुरुवात ही जहाज निर्मिती व्यवसायापासून झाली होती. 

lovji nusserwanjee wadia यांच्या नेतृत्त्वाखाली व्यवसाय क्षेत्रात उडी घेतलेल्या या समुहानं पहिलं काम हे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीसाठी केलं असून, समुहाकडून 355 जहाजांची निर्मिती करण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. जवळपास 130 वर्षांसाठी वाडिया समुहानं या उद्योगात योगदान दिलं आणि त्यानंतर 1869 मध्ये व्यवसाय विस्तारीकरणाच्या हेतूनं ट्रेडिंग क्षेत्रात काम केलं. या कामासाठी बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात (BBTCL) ची स्थापना करण्यात आली. 

टीकच्या लाकडाचा पुरवठा आणि विक्री करत पुढं या समुहानं चहा, कॉफी आणि इतर सामग्रीच्या ट्रेडंग क्षेत्रात उडी घेतली. पुढला निर्णय मोठा होता. कारण, वाडिया समुहानं 1879 कापड उद्योगात पाऊल ठेवत बॉम्बे डाईंगची सुरुवात केली. (BOMBAY DYEING) या कंपनीची आजही चर्चा असून, अनेकांचीच या ब्रँडच्या कापडाला आणि उत्पादनांना पसंती असते. या ब्रँडचा पाया नौरोजी वाडिया यांनी रचला होता. 

आता उद्योगाला चांगलीच चालना मिळाली होती. ज्यामुळं कंपनीनं 1892 मध्ये अवघ्या 295 रुपयांच्या गुंतवणुकीवर बिस्किट उत्पादनात नशीब आजमावण्याचं ठरवलं आणि आज हा ब्रँड ब्रिटानिया म्हणून ओळखला जातो. 

स्वातंत्र्योत्तर काळात सोन्याचे दिवस... 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत वाडिया समूहानं उद्योग क्षेत्रात कैक वर्ष सरशी मिळवली. नव्या पिढ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि यातूनच नव्या संकल्पना प्रत्यक्षरुपात आणण्यात आल्या. वाडिया समूह आज ज्या ठिकाणी आहे तिथं पोहोचवण्यासाठी विद्यमान अध्यक्ष नुस्ली वाडिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

हेसुद्धा वाचा : घरादारासकट प्रवास करा; Mahindra च्या 'या' दमदार कारची किंमत 2 लाखांनी घटली 

 

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी 1977 मध्ये त्यांच्यावर ही जबाबजारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी बॉम्बे डाईंगची धुरा त्यांच्या वडिलांच्या खांद्यांवर होती, हा तोच काळ होता जेव्हा ही कंपनी विकण्याचा विचारही करण्यात आला पण, नुस्ली यांनी त्यास विरोध केला आणि नवनवीन क्षेत्रात उद्योग समुहाला नवी ओळख आणि झळाळी दिली. 

Go Air आताचं Go First सुद्धा याच कंपनीचं प्रोडक्ट अर्थात विमानसेवा पुरवणारी कंपनी. सध्याच्या घडीला नुस्ली वाडिया 80 वर्षांचे असून, त्यांच्या समुहातील एफएमजीसी, कापड, विमानसेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची पूर्ण जबाबदारी नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया या त्यांच्या मुलांवर सोपवण्यात आली आहे. नेस वाडिला बर्मा ट्रेडिंगच्या कार्यकारी संचालकपदी असून, ब्रिटानियामध्येही त्यांची भागिदारी आहे. तर, जहांगीर वाडिया यांच्याकडे गो फर्स्टची जबबादारी सोपवण्यात आली आहे. कमाल आहे ना या सर्वाच जुन्या उद्योजक कुटुंबाची कहाणी.....!