केंद्र सरकारविरोधात आता काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव

केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असून मंगळवारी प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महासचिवांना याबाबत नोटीस दिली असून २७ मार्चला काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात ठेवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2018, 10:26 PM IST
केंद्र सरकारविरोधात आता काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव   title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला असून मंगळवारी प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी महासचिवांना याबाबत नोटीस दिली असून २७ मार्चला काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात ठेवण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा कोणाचा?

पक्षाने सर्व खासदारांना तीन ओळींचा पक्षादेश जारी केला असून लोकसभेमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिलीये. अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा मिळवण्यासाठी खरगे अन्य विरोधी पक्षांशी चर्चा करत आहेत. 

याआधी अविश्वास ठराव

तेलगू देसम आणि वाय एस आर काँग्रेस या पक्षांनी यापूर्वीच अविश्वास प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र लोकसभेत कामकाजच होत नसल्यामुळे हे ठराव अद्याप पटलावर आलेले नाहीत.