'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, राजस्थान सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली आहे.

Sunil Desale Updated: Mar 23, 2018, 10:11 PM IST
'या' राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ title=
File Photo

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण, राजस्थान सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली आहे.

आता इतका झाला महागाई भत्ता

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्के होणार आहे.

इतक्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

ही वाढ १ जानेवारी २०१८ पासून देण्यात येणार आहे. याचा लाभ राज्य सरकारच्या जवळपास ८ लाख कर्मचारी आणि ३.५ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.

या तारखेपासून मिळणार महागाई भत्ता

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा वाढीव महागाई भत्त्याशी संबंधित राशी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. १ मार्च २०१८ पासून महागाई भत्ता प्रत्येक महिन्याला दिला जाणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००४ आणि त्यानंतर नियुक्त राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याचं पेमेंट रोख स्वरुपात केलं जाईल. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात जवळपास ९५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे.