जम्मू काश्मीरमध्ये एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा

सरकार घेणार मोठा निर्णय...

शैलेश मुसळे | Updated: Apr 30, 2018, 06:34 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये एनएसजी करणार दहशतवाद्यांचा खात्मा title=

नवी दिल्ली : दहशतवादी विरोधी पथक एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. दहशवतादी हल्ला आणि लोकांना बंधक बनवण्याच्या घटनांशी निपटण्यासाठी सरकार यावर विचार करत आहे. गृहमंत्रालयाने काश्मीर खोऱ्यात एनएसजी तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दहशतवाद्यांसोबत निपटण्यासाठी भारतीय जवानांना, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी ही कमांडो काम करतील. काश्मीरमध्ये एनएसजी तैनात करण्याचा विचार असून दहशतवाद्यांसोबत आणि लोकांना बंधक बनवण्याच्या घटनाशी निपटण्यासाठी कमाडोंना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

याआधी देखील काश्मीरमधील पूर्व खोऱ्यात ब्लॅक कमांडो तैनात करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये यामुळे सुरक्षेच्या बाबतीत मोठा फायदा होऊ शकतो. गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी एनएसजीच्या एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्य़ा आव्हानांना कमी करण्यासाठी एसएसजीची भूमिका कशी बदलता येईल. कारण दहशतवादी लोकांना पुढे करुन आणि नागरिकांच्या परिसरात घुसून लपतात. अशा स्थितीत हे कमांडो मोठी भूमिका बजावू शकतात. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर 1984 मध्ये एनएसजीचं गठन करण्यात आलं. ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान पंजाबच्या अमृतसर शहराच स्वर्ण मंदिरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा एनएसजीने खात्मा केला होता. एनएसजीमध्ये 7,500 जवान तैनात आहेत.

ब्लॅक कॅट कमांडोंनी मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्यात जानेवारी 2016 मध्ये पठानकोट वायु सेना शिविरमध्ये झालेल्य़ा हल्ल्यात आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिरात घुसलेल्या दहशवाद्य़ांचा खात्मा करण्याच महत्त्वाची भूमिका बजावली होती. संसदेत सादर केलेल्य़ा आकड्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्य़े या वर्षी जानेवारी ते मार्चच्या मध्ये दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास 60 घटना घडल्या. ज्यामध्ये 15 सुरक्षा रक्षक शहीद आणि 17 दहशतवादी ठार झाले.