जम्मू-काश्मीर: हिजबूल मुजाहिद्दीनच्या क्रूर अतिरेक्यांचा खात्मा

दहशतवादी समी अहमत भट उर्फ समीर टायगर याला २४ मार्च २०१६ला दगडपेक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

Updated: Apr 30, 2018, 03:56 PM IST
जम्मू-काश्मीर: हिजबूल मुजाहिद्दीनच्या क्रूर अतिरेक्यांचा खात्मा title=

श्रीनगर : सुरक्षा रक्षकांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर आकिब खान आणि समीर टायगरला कंठस्नान घातले. या दोघांपैकी समीर टायगर हा ए++ कॅटेगरीचा दहशतवादी होता. प्रदीर्घ काळापासून सुरक्षा जवान त्याच्या मागावर होते. दरम्यान, सकाळीच झालेल्या एका शोध मोहिमेत समीर टायगरला जवानांनी घेरले आणि त्याचा खात्मा केला. समीर टायगर हा अत्यंत क्रूर दहशतवादी म्हणून ओळखला जात असे. २०१६मध्ये मारला गेलेला दहशतवादी बुरहाण वाणी लष्कराशी झालेल्या चकममकीत मारला गेल्यावर टायगरहा काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय बनला होता.

दहशतवादी वृत्तीच्या लोकांचा पोस्टर बॉय

सुरक्षा रक्षकांनी सोमवारी सकाळी पुलवामा द्रबगाम येथे समीर टायगर आणि आकिबला घेरले. पुलवामा येथील राहणारा समीर टायगर हा अनेक क्रूर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. बुरहाण वाणीच्या मृत्यूनंतर समीर टायगरला दहशतवादी संघटनांनी काश्मीर खोऱ्यातील पोस्टर बॉयच्या रूपात पुढे आणले होते. समीरने दहशतवादी कारवाया करतान गोळीबारही केला होता.

कारागृहातून सुटला दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात फसला

दहशतवादी समी अहमत भट उर्फ समीर टायगर याला २४ मार्च २०१६ला दगडपेक केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर २९ मार्चला त्याची सुटका झाली. मात्र, कारागृहातून बाहेर येताच तो, दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनच्या जाळ्यात फसला. ७ मे २०१६ पासून तो हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आहे.