Viral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच....'

Viral Video:  हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 7, 2024, 02:31 PM IST
Viral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच....' title=
old lover Viral Video

Viral Video: लग्न कार्यामध्ये वराने वधुच्या कपाळी कुंकू लावण्याचा विधी असतो. या विधीनंतर लग्न पूर्ण झाल्याचे मानतात. तुम्ही अनेक सिनेमांमध्ये हे दृश्य बघितले असेल. पण नवऱ्या मुलाने नवरीच्या कपाळी कुंकू लावण्याआधी दुसराच कोणीतरी कपाळी कुंकू भरले तर? ऐकायला विचित्र वाटतंय ना?

कुठेतरी लग्न सुरु आहे. मुलगा-मुलगी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. इतक्यात मागून कोणीतरी येतो आणि नवरीचे कपाळ कुंकवाने भरतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबवर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून खूप हसू येत तर काही व्हिडीओ पाहून अरे हे चाललंय काय? असा प्रश्न आपल्या मनात येतो. त्यामुळे मजेशीर वाटणारे व्हिडीओदेखील आपल्याला धक्का देऊन जातात. यात आता आणखी एका व्हिडीओची भर पडणार आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा-नवरी स्टेजवर बसले आहेत. परिवारातील नातेवाईक गाणी गात आहेत. यावेळी नवरीच्या मागून एक वयस्कर इसम येतो आणि तिच्या कपाळी कुंकू लावतो. एक-दोन वेळेसच नव्हे तर अनेकवेळा तो नवरीच्या कपाळी कुंकू भरतो. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता. 

म्हाताऱ्या माणसाची ही करामत पाहून दोन्हीकडच्या परिवारातील मंडळी हैराण झाले.  @apanmaithili01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यावर एक कॅप्शन देण्यात आलंय. बिहारच्या छपरा जिल्ह्यात नवरीचा प्रियकर आला तिच्या भांगेत कुंकू भरुन गेला' असे यावर लिहिलंय. 

सध्या लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. जे केवळ मनोरंजनाच्यादृष्टीने बनवले जातात. यातील बहुतांश व्हिडीओ फेक असतात. याआधी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. ज्यामध्ये विद्यार्थीनीने फीस न भरल्याने शिक्षकाने तिच्याशी लग्न केले, असा कंटेंट या व्हिडीओत दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये काम करणारी मंडळी बऱ्याचदा तिच असतात. जी वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये येतात आणि व्हिडीओ बनवून सर्वांचे मनोरंजन करतात.