खेळाच्या नादात स्वीमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, बाहेर येण्यासाठीचा संघर्ष अंगावर काटा आणणारा

लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! डोळ्यात तेल घालून जपा... तुमची नजरचूक त्यांच्या जीवावर बेतू शकते... पाहा या चिमुकलीसोबत काय घडलं...

Updated: Jan 31, 2022, 05:58 PM IST
खेळाच्या नादात स्वीमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, बाहेर येण्यासाठीचा संघर्ष अंगावर काटा आणणारा  title=

नवी दिल्ली : लहान मुलांचा निडरपणा आणि त्यांची कृती सगळ्यांनाच आवडते. मुलांचं कौतुक चांगलं वाटत असलं तरी कधीतरी ते धोक्याचंही ठरतं. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून जपायला हवं. थोडं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे चिमुकल्यांना एक सोडू नका. या चिमुकलीसोबत जे झालं ते आपल्या मुलांसोबत होणार नाही याची खबरदारी घ्या. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली स्वीमिंगपूलजवळ खेळत आहे. खेळता-खेळता ती अचानक स्वीमिंग पूलच्या दिशेनं जाते. स्वीमिंग पूलमध्ये उतरण्याचं धाडस करते. पाण्याचा अंदाज या चिमुकलीला नाही. 

स्वीमिंगपूलमध्ये ही चिमुकली पडते आणि गटांगळ्या खाऊ लागते. काही झालं हे समजण्याआधी आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते. दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी तिथे असलेला एक माणूस पटकन उडी मारून स्वीमिंग पूलमधून या मुलीला बाहेर काढतो. 

या चिमुकलीसोबत जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. चिमुकलीला काही मिनिटं एकटं सोडणं चांगलंच महागात पडलं आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@_.nnn.zziii)