कात्रीत सपडलीय बिचारी म्हैस! नक्की कोण करणार तिची शिकार पाहा थरारक व्हिडीओ

दोन शिकारी एक शिकार! कोण करेल कोणाची शिकार पाहा थरारक व्हिडीओ

Updated: Feb 16, 2022, 02:21 PM IST
कात्रीत सपडलीय बिचारी म्हैस! नक्की कोण करणार तिची शिकार पाहा थरारक व्हिडीओ title=

नवी दिल्ली : कधी कधी आपली परिस्थिती अशी येते की काय करावं समजत नाही. दोन्ही बाजूने संकट घेरलेलं असतं. अशावेळी जर त्यातून मार्ग काढता आला तर सुखरुप बाहेर पडतो. नाहीतर संकटात सापडतो. असाच काहीसा प्रकार म्हशीच्या बाबतीत घडला आहे. ही म्हैस दोन्ही बाजूनं अडकली आहे.

म्हशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, म्हशीच्या मागे सिंह लागले आहेत. सिंहांना म्हशीची शिकार करायची आहे. म्हैंस सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी पाण्याच्या दिशेनं पळते आणि नदीमध्ये उतरते. 

म्हैस नदीमध्ये उतरते आणि सुटकेचा निश्वास टाकणार तोच मगर तिच्यावर हल्ला करते. मगर तिची शिकार करण्यासाठी पुढे धावते. आता पाण्यातून बाहेर गेलं तर सिंह खाणार आणि पाण्यात राहिलं तर मगर.

म्हैस आपला जीव वाचवण्यासाठी कशीबशी नदीकिनाऱ्यावर पोहोचते. तिथे येऊन उभी राहाते. कुठे जावं हे तिला कळत नसतं. त्यामुळे ती शांतपणे उभी असते. पुढे सिंह आणि मागे मगर आशा दोन्ही संकटात ती अडकलेली असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओवर युजर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी अशी परिस्थिती आपल्या आयुष्यातही असते अशी कमेंट केली आहे. तर काहींनी रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत. शिकारीचा थरार दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@nature27_12)