तमिळनाडू : आपण नाणी असतील तर ती कोणालातरी देऊन त्या बदल्यात पैसे घेतो. एखादं नाणं कमी जास्त असेल तर वाद घालत नाही सोडून देतो. पण एक व्यक्तीनं नाणी साठवून त्यातून भलीमोठी कार विकत घेतली आहे. तुम्ही जर नाणी अशीच ठेवत असाल किंवा असं काही करत असाल तर ती साठवून ठेवा. काय माहिती कदाचित तुम्हीही एखादं घर घेऊ शकता किंवा गाडी घेऊ शकता.
10 रुपयांची नाणी साठवून व्यक्तीने चक्क महागडी कार विकत घेतली आहे. या व्यक्तीचं नाव वेत्रिवेल असल्याचं सांगितलं जात आहे. तो एक शाळा आणि मेडिकल स्टेअर चालवतो. त्याच्या आईचं छोटं दुकान आहे. जेवढे लोक दुकानावर येतात ते 10 रुपयांचं नाणं देतात. त्यामुळे 10 रुपयांची खूप नाणी त्याच्याकडे जमली होती.
पुढे तो सांगतो की मी ही नाणी घेऊन बँकेतही गेलो होतो. मात्र त्यांनी नोटा देण्यास नकार दिला. बँकेच्या म्हणण्यानुसार एवढी नाणी मोजण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे नाणी घेऊ शकत नाही असंही बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. वेत्रिवेलने एका महिन्यात 6 लाख 10 रुपयांची नाणी गोळा केली.
वेत्रिवेलने गाडी घेण्याचा निश्चय केला. त्याने गाडी निवडली आणि जेव्हा पेमेंट करण्याची वेळ आली तेव्हा त्याने 10 रुपयांची ही सगळी नाणी त्यांना दिली. शोरुमच्या मालकाला मनवण्यासाठी त्याला मेहनत करावी लागली हे देखील तेवढंच खरं आहे. यावरून लक्षात घ्या की 10 रुपयांची किंमत काय असू शकते.