Omicron : कर्नाटकनंतर आता या राज्यात आढळले 2 संशयित रुग्ण

कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानंतर देशाची चिंता वाढली असताना आता आणखी एका राज्याने चिंता वाढवली आहे.

Updated: Dec 3, 2021, 01:41 PM IST
Omicron : कर्नाटकनंतर आता या राज्यात आढळले 2 संशयित रुग्ण

मुंबई : कर्नाटकमध्ये कोविड 19 (Covid 19) च्या ओमिक्रोन (Omicron) वेरिएंटचे 2 रुग्ण आढळल्यानंतर आता दिल्लीत (Delhi) देखील 12 लोकं संक्रमित असल्याची माहिती पुढे येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, ओमिक्रोन वेरिएंटचे संशयित रुग्ण असल्याने त्यांना लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (Omicron suspected patient found in Delhi)

सूत्रांच्या माहितीनुसार, आठ ओमिक्रोन संशयित गुरुवारी एलएनजेपी रुग्णालयात भर्ती झाले. तर चार संशयित आज भर्ती झाले आहेत. आज भर्ती झालेल्या लोकांपैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 2 जणांचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. 

चार संशयित पैकी दोन ब्रिटेन, एक फ्रान्स तर एक नेदरलँड वरुन भारतात आले आहेत. चारही संशयित रुग्णांचे सॅम्पल जीनोम सीक्वेंसिंगसाठी पाठवले गेले आहेत.