नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. मात्र त्यातही एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. ओमायक्रॉन वेगाने पसरत आहे. पण ब्रिटिश मेडिकल काउन्सिलच्या एका माजी शास्त्रज्ञाने धावा केला आहे. त्याने जे सांगितलं त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ओमायक्रॉन कोरोनाचा संपूर्ण नाश करेल. ओमायक्रॉनमुळे कोरोना नष्ट होईल असं तज्ज्ञांचं मत आहे.
डेल्टाच्या तुलनेत धोकादायक नाही
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डेल्टा व्हेरिएंट फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करतो. तर ओमायक्रॉन हळूहळू पसरतो. ओमायक्रॉनमुळे जास्त समस्या होत नाही. पण डेल्टा व्हेरिएंट हा अधिक धोकायदायक आहे.
ओमायक्रॉनचा संसर्ग जरी दुप्पट वेगानं होत असला तरी फुफ्फुसांवर त्यांचा परिणाम वेगानं होत नाही. ब्रिटिश मेडिकल काउन्सिल वैज्ञानिक डॉक्टर राम एस. उपाध्याय यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. ओमायक्रॉन फुफ्फुसांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा वेळ 10 पटीनं कमी झालेला असतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची गरज पडेलच असं नाही.
श्वासनलिकेमध्ये ‘म्यूकोसल इम्यून सिस्टम’ असते, जी रोगप्रतिकारक शक्तीचं केंद्रस्थान मानलं जातं. तिथे एन्टीबॉडी तयार होतात. ज्याला 'इम्युनोग्लोब्युलिन आईजीए' म्हणतात. आता ओमायक्रॉन श्वासनलिकेमध्येच त्याची संख्या वाढवते, त्यामुळे एन्टिबॉडी जास्त अॅक्टिव्ह होतात. ओमायक्रोनचा धोका वाढण्याआधीच एंटिबॉडी अॅक्टिव्ह झाल्यामुळे धोका कमी होतो.
कसा करणार कोरोनाचा सर्वनाश?
हेच काम कोरोना विरुद्ध लढण्यासाठी वॅक्सीन देखील करत. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हेच लसीचं काम असतं. ओमायक्रॉन हळूहळू शरीरात पसरतो. जेवढ्या लोकांना त्याचा संसर्ग होतो तेवढ्या जास्त लोकांमध्ये नॅचरल इम्युनिटी तयार होत असते असाही दावा या अहवालात करण्यात आला आहे. एंटिबॉडी तयार होण्यासाठी आणि इम्युनिटीसाठी ओमायक्रॉन चांगलं असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
डेल्टा व्हेरिएंट जेव्हा शरीरात पसरतो तेव्हा तो अति धोक्याची स्थिती निर्माण होते. डेल्टामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत. ओमायक्रॉन शरीर कमोजर नाही तर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं इम्युनिटी तयार करतं असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हा नवा व्हेरिएंट कोरोनाचा सर्वनाश करेल असा विश्वास तज्ज्ञांना आहे.