अहमदाबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा गुजरात दौरा सुरू केलाय. पहिल्याच दिवशी काल त्यांनी द्वारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राहुल गांधींचे गुजरातमध्ये आगमन होताच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटवरून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या मे महिन्यात हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा पर्याय खुला असल्याचं सांगितलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर लगेचच पटेलांच्या आरक्षणाचा मुद्या निकाली काढण्याची अट घातली होती. त्यामुळे पुढच्या काळात आता राहुल आणि हार्दिक एकत्र येणार का याकडे लक्ष लागलेय.