का होतेय एकशिंगी गेंड्याची सर्वत्र चर्चा? तुम्ही पहिलाय का हा व्हिडीओ?

हे प्रामुख्याने भारतीय गेंड्यांच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते.

Updated: Dec 12, 2021, 02:23 PM IST
का होतेय एकशिंगी गेंड्याची सर्वत्र चर्चा? तुम्ही पहिलाय का हा व्हिडीओ? title=

कोलकत्ता : गोरुमारा राष्ट्रीय उद्यान (Gorumara National Park) हे भारताच्या उत्तर पश्चिम बंगालमधील एक राष्ट्रीय उद्यान आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डुअर्स प्रदेशात स्थित, हे गवताळ प्रदेश आणि जंगले असलेले मध्यम आकाराचा पार्क आहे. हे प्रामुख्याने भारतीय गेंड्यांच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते. 2009 सालासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाने भारतातील संरक्षित क्षेत्रांपैकी हे उद्यान सर्वोत्कृष्ट म्हणून घोषित केले आहे.

मार्च 2021 पर्यंत, कोविड-19 महामारीमुळे अनेक महिने बंद राहिल्यानंतर हे उद्यान पर्यटकांसाठी खुले आहे. ज्यानंतर या भागात एकशिंगी गेंडा पहिल्यांदा पाहिला गेला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्यानात 250 हून अधिक गेंडे आहेत. एकशिंगी गेंड्याचा देखील समावेश आहे.

अनेक पर्यटक हा एकशिंगी गेंडा पाहण्यासाठी येथे येतात. परंतु आतापर्यंत कोणालाच त्याला पाहाता आलं नाही, ज्यामुळे पर्यंटक हताश होऊन घरी ज्यायचे. परंतु आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच एकशिंगी गेंडा पाहायला मिळाला आहे.

या व्हिडीओत एकशिंगी गेंडा पाहिल्यानंतर लोकांना फार आनंद झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिंगीगेंडा पाणी प्यायला नदीकाठी आला आहे. त्यावेळेस त्याला कॅमेरामध्ये कैद करण्यात आले आहे.