मुंबई: झी एंटरटेनमेंट इंटरप्रायजेज लिमिटेड (ZEEL) चे डिजिटल बिझनेस आणि प्लेटफॉर्मचे अध्यक्ष अमित गोयंका यांचा लंडनमध्ये पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा मोठा पुरस्कार अमित गोयंका यांना मिळाला आहे.
अमित गोयंका यांचा 21st Century Icon पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल अमित गोयंका यांचा सन्मान करण्यात आला आहे. अमित गोयंका यांना मिळालेला हा पुरस्कार पारुल गोयंका यांनी घेतला आहे.
अमित गोयंका यांचा पुरस्काराने सन्मान
21st Century Icon हा बहुप्रतिष्ठित पुरस्कार लंडनमध्ये स्क्वेअर वॉटरमेलन लिमिटेड द्वारे दिला जातो. उद्योजक, तरुण आणि इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी हा उत्तम कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.
अमित गोएंका यांना ZEE डिजिटल व्यवसायाच्या माध्यमातून मीडिया आणि मनोरंजन विश्वात मिळालेल्या यशाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. ZEE5 च्या विकासात अमित गोयंका यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी कंपनी पुढे नेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार केला. त्यांच्या या कामगिरीसाठी अमित गोयंका यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
गोयंका यांची पहिली प्रतिक्रिया
पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यानंतर गोयंका यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार मला मिळाल्याचा आनंद होत आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून ऋणी आहे.
हा पुरस्कार मिळणं म्हणजे आमच्या टीमने घेतलेली सततची मेहनत आणि त्यांच्या कामगिरीचा हा एक पुरावा आहे. Zee Entertainment चे डिजिटल प्लॅटफॉर्म हे नव्या पिढीसाठी तरुणांसाठी आम्ही तयार केले आहेत. ज्या द्वारे तरुण आणि नवोदित आमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. नवोदितांना उत्तम दर्जाचं मनोरंजन या माध्यमातून देता येईल.
येत्या काळात आमचा डिजिटल प्लॅटफॉर्म आणखी मोठा होईल याची मला पूर्ण खात्री आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी अधिक प्रेरणा देणारा आहे. येणाऱ्या समस्या आणि अडचणींवर मात करत येत्या काळात अधिक परिश्रम आणि मेहनतीनं आणखी मोठं यशाचं शिखर गाठायचं आहे. असंही अमित गोयंका यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हा पुरस्कार देण्यामागे व्यवसायातील लीडर्सना पुढे आणण्याचं आणि इतरांना प्रेरणा देण्याचा हेतू आहे. अमित गोयंका हे पुढच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असणार आहेत. त्यांनी कंपनीसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे जी आपल्या सगळ्यासाठी सन्मानाची बाब आहे. अशी प्रतिक्रिया स्क्वेयर्ड वाटरमेलन लिमिटेडची सह-संस्थापक प्रीती राणा यांनी दिली आहे.