Onion Price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आता कांद्याचे भाव देखील वधारले

45 दिवसात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत.   

Updated: Feb 22, 2021, 01:37 PM IST
Onion Price Hike: पेट्रोल-डिझेलनंतर आता कांद्याचे भाव देखील वधारले title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. सर्व सामान्य लोकांना धक्का देणारी बाब म्हणजे रोजच्या वापरातील कांद्याचे भाव देखील वधारले आहेत. कांद्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या डेळ्यात पाणी आलं आहे. गेल्या दीड महिन्यात कांद्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या लासलगावमध्ये दोन दिवसांत कांद्याचे दर प्रति क्विंटलमागे 1000 रुपयांनी महाग झाले आहेत. तर दिल्लीत कांद्यासाठी 50 रूपये मोजावे लागत आहेत. तर किरकोळ किंमत 65 ते 75 रुपये किलोवर पोहोचली आहे.

मीडिया रिपेर्टनुसार लासलगाव बाजारात गेल्या दोन दिवसात प्रति क्विंटलमागे 970 रूपयांनी वाढले असून 4200 ते 4500 रूपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. नाशिकच्या लासलगाव बाजारातून संपूर्ण देशात कांदा पाठवण्यात येतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. 

शनिवारी लासलगावमध्ये कांद्याची सरासरी किंमत 4250-4551 रुपये प्रति क्विंटल होती. दरम्यान, अवकाळी पावसामुळे कांद्याचे दर वाढत आसल्याची प्रतिक्रिया एका कांदा व्यापाऱ्याने दिली आहे. 20 फेब्रुवारी रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे दर 3500-4500 रूपये प्रति क्विंटलवर पोहोचले. महत्त्वाचं म्हणजे येत्या काही दिवसाता कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता दर्शवली आहे.