Online shoppingमध्ये योग्य वस्तूची डिलिव्हरी न झाल्यास काय करावे? ग्राहक कायदा जाणून घ्या

आजकाल लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढला आहे. कोरोना काळात लोकं बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळतात.

Updated: Jun 29, 2021, 12:19 PM IST
Online shoppingमध्ये योग्य वस्तूची डिलिव्हरी न झाल्यास काय करावे? ग्राहक कायदा जाणून घ्या title=

मुंबई : आजकाल लोकांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढला आहे. कोरोना काळात लोकं बाहेरच्या लोकांशी संपर्क टाळतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपींग हा एक उत्तम पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहे. त्यात ऑनलाईन शॉपींगमुळे लोकांना काही ऑफर्स देखील मिळतात. ज्यामुळे लोकांना त्याचा फायदा घेता येतो. परंतु प्रत्येक वस्तूच्या फायद्या सोबत त्याचे तोटे देखील असतात. त्यात ऑनलाईनमुळे देखील लोकांसमोर काही समस्या उद्भवू लागल्या आहेत. जसे की, मागवलेल्या सामानाची क्वालीटी खराब असणे. मागवलेल्या सामाना व्यतीरिक्त दुसराच सामान येणे. हे सगळं घडत असतं.

अशा वेळी काय करायचे हे लोकांना कळत नाही. कोणाकडे मदत मागावी हे देखील कळत नाही. कारण बऱ्याचदा या कंपन्यांचे हेल्पडेस्क आपल्याला हवी तशी मदत करत नाही. अशा वेळी काय करावे? असा लोकांना प्रश्न पडतो. परंतु असे लोकं कायद्याच्या मदतीने आपले प्रश्न सोडवू शकतात.

जर कोणताही सप्‍लायर किंवा कंपनकडून आपल्याला कोणताही सामान मिळाला नसेल किंवा त्याबदली आपल्याला दुसरीच कोणतीतरी वस्तू मिळाली असेल. अशा वेळी कंपनीची ही जबाबदारी असते की, त्यांनी ती वस्तू बदलून द्यावी.

उदाहरणार्थ, बहुतेकदा असे ऐकले जाते की, ग्राहकाने मोबाइल मागवले होते, परंतु त्या बदल्यात कंपनीने दगड भरून पाठविले. असे झाले तर, कंपनीची ही जबाबदारी आहे की, त्यांनी तो मोबाईल पुन्हा बदलून द्यावा.

तीन स्तरांवर कंज्‍यूमर कोर्ट

जर कंपनी तुमचे सामान तुम्हाला देत नसेल तर, आपण कंज्यूमर फोरममध्ये याची तक्रार करू शकता. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये अशा खटल्यांची सुनावणी घेण्यासाठी तीन स्तरांवर ग्राहक न्यायालये स्थापन केली गेली आहेत. जर या प्रकरणात वस्तूची किंमत 20 लाखांपर्यंत असेल तर, तुम्ही जिल्हा ग्राहक फोरममध्ये तक्रार करू शकता.

जर केस 20 लाखांपेक्षा जास्त आणि एक कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर आपण राज्य ग्राहक आयोगामध्ये खटला दाखल करू शकता.

खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांचे मूल्य 1 कोटींपेक्षा जास्त असल्यास आपण थेट राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे संपर्क साधू शकता.

 ग्राहक कायद्यांतर्गत अशा प्रकरणांमध्ये राज्य व केंद्र सरकारलाही दंड करण्याचा अधिकार आहे.

आपली तक्रार कशी नोंदवायची?

1. आपण ग्राहक असल्यास आपण जिल्हा ग्राहक फोरम, राज्य ग्राहक आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकता.

2. ग्राहक या विषयावर consumerhelpline.gov.in वर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतील.

3. याशिवाय टोल फ्री क्रमांकावर 14404 किंवा 1800-11-4000 वर कॉल करूनही तक्रार नोंदवली जाऊ शकते.

4. 8130009809 या क्रमांकावर एसएमएस पाठवूनही ग्राहक तक्रारी करु शकतात.

5.एसएमएस मिळाल्यानंतर ग्राहकांना फोन करून त्याची तक्रार नोंदविली जाईल.