रक्त गोठवणाऱ्या तापमानात गळ्यात स्टेथोस्कोप, हातात बंदूक... कॅप्टन दीपशिखा यांनी रचला इतिहास

कॅप्टन दीपशिखा यांचीच सोशल मीडियावर चर्चा 

Updated: Jun 29, 2021, 11:38 AM IST
रक्त गोठवणाऱ्या तापमानात गळ्यात स्टेथोस्कोप, हातात बंदूक...  कॅप्टन दीपशिखा यांनी रचला इतिहास  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कराकडून महिला अधिकाऱ्यांबाबतच्या अनेक चांगल्या बातम्या समोर येत आहेत. आता भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना देखील स्थायी स्वरूपात नियुक्त केल जाऊ लागलं आहे. गेल्यावर्षी लष्कराकडून महिला सैनिकांना जम्मू काश्मिरच्या नियंत्रण रेषेवर म्हणते LOC जवळ तैनात करण्याचा इतिहास रचला होता. (Why people talking about Indian Army Officer Dr Deepshikha Chettri, Who is She?)  आता लष्कराने आणखी एक मैल पार केला आहे. लष्कराच्या कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर तैनात केलं आहे. 

सिक्किमची राहणारी कॅप्टन दीपशिखा 

कॅप्टन दीपशिखा छेत्री सिक्किमची राहणारी आहे. सिक्किममधील दीपशिखा या दुसऱ्या महिला ऑफिसर आहेत. डॉक्टर दीपशिखा यांनी आर्मी मेडिकल परिक्षेत संपूर्ण देशात सहावा क्रमांक पटकावला आहे. तसेच त्यांनी लष्करातील मेडिकल परिक्षेत महिला उमेदवारमध्ये दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. हे फक्त कॅप्टन दीपशिखा यांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना आणि संपूर्ण राज्यासाठी गौरवाची बाब आहे. काही दिवसांपर्वी सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी याबाबत माहिती दिली होती. 

आर्मी परिक्षेत कॅप्टन दीपशिखा टॉपर 

कॅप्टन दीपशिखा यांचे वडिल राजेंद्र छेत्री आणि त्यांची आई बिंदु छेत्री यांना आपल्या मुलीचा अभिमान आहे. कॅप्टन दीपशिखा यांनी सिक्किम मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेजमध्ये एमबीबीएस परिक्षेत टॉप केलंय.  कॅप्टन दीपशिखा आता पुढील आठ महिने फ्रंटलाइनवर काम करतील. त्या फक्त एक डॉक्टरच नाही तर एक सैनिक म्हणूनही कार्यरत आहेत. ही भूमिका फक्त कॅप्टन दीपशिखा यांच्यासाठीच नाही तर देशातील संपूर्ण युवा पिढीसाठी अभिमानाची बाब आहे. 

राजौरीचे उड्डाण करणारे अधिकारीही चर्चेत 

कॅप्टन दीपशिखा छेत्री व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरच्या माव्या सुदाननेही भूतकाळात उड्डाण करणारे अधिकारी बनून इतिहास रचला आहे. फ्लाइंग ऑफिसर सुदान यांना भारतीय वायुसेनेत (आयएएफ) फायटर पायलट म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ती जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील आहे. या राज्यातील ती पहिली महिला लढाऊ पायलट आहे. फ्लाइंग ऑफिसर सुदान हा राजौरीतील नौशेरा येथील छोट्या गावातल्या लांबेरीचा रहिवासी आहे. फ्लाइंग ऑफिसर माया ही एएएफची 12 वी महिला लढाऊ पायलट आहे.

LOC वर महिला तैनात 

लष्कराने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एंटी टेरर ऑपरेशन्समध्ये महिला सैनिक तैनात करण्यास सुरूवात केली होती. ही पहिली संधी होती जेव्हा महिला सैनिकांना एलओसीच्या जवळ तैनात करण्यात येणार आहे. लष्कराच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, महिला अधिकारी तैनात केल्याने अँटी-ड्रग्स विरोधी ग्रिड आणखी मजबूत केली जात आहे. नार्को कुत्र्यांव्यतिरिक्त हे अधिकारी एक्स-रे मशीनदेखील सुसज्ज होते. अंमली पदार्थांच्या व्यतिरिक्त या महिला सैनिकांवर आयईडी शोधण्याचीही जबाबदारी आहे. या महिला सैनिकांना सैन्याने 10,000 फूट उंचीवर तैनात केले होते.