केवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट

तुम्ही केवळ ४ मिनिटात अकाऊंट उघडू शकता. तसेच ४ मिनिटांत रक्कम ट्रान्सफरही करु शकता. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2017, 06:04 PM IST
केवळ पाच मिनिटात उघडा सेव्हिंग अकाऊंट  title=

नवी दिल्ली : सेव्हिंग अकाऊंट उघडणे हा अनेकांसमोरचा मोठा प्रश्न बनलेला असतो. बऱ्याचजणांना हे किचकट काम वाटते. पण देशाची सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ही पद्धत खूप सोपी करुन ठेवली आहे. 

YONO

YONO(यू ओनली नीड वन)  या नव्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ ४ मिनिटात अकाऊंट उघडू शकता. तसेच ४ मिनिटांत रक्कम ट्रान्सफरही करु शकता. 

एकाच प्लॅटफॉर्मवर

तुमच्या लाईफस्टाईलशी जोडलेल्या वस्तूंपासून ते वित्तीय सेवांपर्यंत सर्व सुविधा देणारा हा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. हा नवा अॅप अॅण्ड्रॉईड, आयओएस अशा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 

> एसबीआय खाती डिजिटल पद्धतीने ५ मिनिटांत उघडली जातील

> ४ क्लिकमध्ये निधी हस्तांतरण शक्य

> बिना पेपरवर्क प्री अप्रूव्ड वैयक्तिक कर्ज

> एफ.डी साठी ओव्हरड्राफ्ट सुविधा

> खर्चाचे पूर्ण हिशोब

> गुंतवणूक उत्पादने, विमा खरेदी सुविधा

१४ सेवा एकाच अॅपवर 

> १४ भिन्न श्रेणींमध्ये आपल्यासाठी पुस्तके, कॅब बुकिंग, मनोरंजन, अन्नपदार्थ, प्रवास आणि वैद्यकीय सेवांचा समावेश 

यासाठी बँकेचा ६० ई-कॉमर्स कंपन्यांसोबत करार 

> अमेझॉन, उबेर, मिनिस्ट्री, शॉपर्स स्टॉप, थॉमस कुक, ट्रॅव्हल इत्यादींचा समावेश 

> IOS आणि Android वापरकर्ते हा अनुप्रयोग डाउनलोड करू शकता