मायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही

Updated: Nov 16, 2017, 11:40 PM IST
मायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली title=

लखनऊ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही, अशी भूमिका बसपाच्या अध्यक्षा मायवतींनी घेतली आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आलं तरी निवडणुकीत आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या पाहिजेत, हे सांगायलाही मायावती विसरल्या नाहीत.

गुजरात विधानसभेमध्ये बसपानं काँग्रेसकडे १८२ पैकी २५ जागांची मागणी केली होती. या सगळ्या जागा मागच्या निवडणुकीत काँग्रेसनं हरल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशमधल्या ६८ जागांपैकी १० जागा बसपाकडून मागण्यात आल्या होत्या. इथल्या जागाही काँग्रेस मागच्यावेळी हरली होती. आमची ही मागणी काँग्रेसनं फेटाळून लावल्याचं बसपानं सांगितलं आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी करताना सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू असंही मायवतींनी सांगितलं आहे.