मुंबई : ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केल्या जाणाऱ्या आणि शोधल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे. यातील चित्र काहीसे दिसतं पण प्रत्यक्षात ते वेगळेच असतात. त्यामुळे बुद्धीचा चांगलाच कस लागतो. (optical illusion 3 legged horses are hidden in photo if you find them in 20 seconds then you are really a genius)
ऑप्टिकल इल्युजनमुळे तुमचं कौशल्य पणाला लागतं. तसेच संयमाचीही परीक्षा लागते. आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक आव्हान घेऊन आलो आहोत. तुम्हाला 20 सेकंदात सांगायचे आहे की यापैकी किती घोडे असे आहेत ज्यांना फक्त 3 पाय आहेत.
फोटोत पाहू शकता की अनेक घोडे धावतायेत. पण या सर्व घोड्यांना चार पाय नाहीत. हे एक मोठे आव्हान आहे, कारण ते सहज दिसत नाही, तुम्हाला ते काळजीपूर्वक शोधावे लागेल. अनेकांनी 3 पाय असलेले घोडे शोधायचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. मात्र काही मोजकेच हुशार निघाले, ज्यांना 3 पाय असलेले घोडे दिसले.