मुंबई : Optical Illusion सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांना सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच 'डोळ्याची फसवणूक' करणारे अनेक फोटो पाहायला आवडतात. असाच एक प्राणी लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.
अशी अनेक छायाचित्रे वन्यजीव छायाचित्रकारांनी क्लिक केली आहेत, परंतु ती इतके व्हायरल होतील आणि ऑप्टिकल इल्युजनचा विषय बनतील हे त्यांना फारसे माहीत नव्हते. आता नुकताच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोत एक तलाव दिसत आहे आणि बरीच बदके दिसत आहेत. पण नेहमीप्रमाणे त्यात काहीतरी दडलेलं आहे. या चित्रात बदकांसोबत एक हत्तीही कुठेतरी उभा आहे. हा हत्ती अनेक लोक शोधू शकले नाहीत. हा हत्ती शोधण्यासाठी तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे. जर तुम्ही हा हत्ती शोधलात तर तुम्ही Expert आहात असं म्हणायला हरकत नाही.
पहिल्या नजरेत सगळ्यांना एक तलााव आणि अनेक बदकं दिसत आहेत. पण याच फोटोत एक हत्ती देखील लपलेला आहे. हे गोंधळात टाकणारे चित्र पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले.
तुम्हाला हत्ती दिसत नसेल तर तलावाच्या पलिकडच्या बाजूला पाहा. तिथे तुम्हाला हत्ती दिसेल. अनेक लोक हत्तीला बदकांच्या बाजूला शोधत होते. सध्या हे ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.