मुंबई : इंटरनेटवर सध्या अनेक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल होतात. परंतु फार कमी लोक त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ शकतात. अनेकदा या Optical Illusion मुळे तुमच्या मेंदूला चालनाही मिळते आणि ही कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला मजाही येते. नुकतंच असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्हाला वाघाला शोधायचं आहे. Optical Illusion Spot The Hidden Tiger Among The Cow
एक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. बरेच लोकांनी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु, अनेकांनी सांगितलं की, हे ऑप्टिकल भ्रम खूप कठीण आहे. अनेकांना या ऑप्टिकल इल्युजनमध्ये गायींमध्ये वाघ शोधण्यात अपयश आले. मुख्य म्हणजे तुम्हाला 10 सेकंदात गायीमध्ये लपलेला वाघ शोधायचा आहे.
यासाठी तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण करावी लागणार आहे. तुम्ही हा फोटो नीट बघूनही जर तुम्हाला वाघ दिसत नसेल तर निराश होऊ नका.
तुम्हाला वाघ सापडला का? तुम्हाला अजूनही चित्रात वाघ दिसला नसेल तर आता आम्ही सांगतो. फोटोमध्ये उजव्या बाजूला पाहण्याचा प्रयत्न करा उजवी बाजू पाहण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला कदातिच तो वाघ दिसला असेल. हा वाघ शोधण्यासाठी तुम्हाला अगदी छोट्या गोश्टी पाहाव्या लागणार आहेत.
वाघ चित्राच्या अगदी उजव्या बाजूला बसला आहे आणि आपल्या भक्ष्याची वाट पाहत आहे.