Railway Whatsapp Zoop Order: रेल्वेतून लांबचा प्रवास करताना आवडीचे पदार्थ मागवताना प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपाशी पोटी प्रवास करावा लागतो. आता रेल्वेनं यासाठी एक योजना तयार केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आवडीचे पदार्थ आपल्या कोचमध्ये मागवता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅपवर एक मेसेज करावा लागेल. आयआरसीटीसीच्या फूड डिलीव्हरी सर्व्हिस Zoop ने प्रवाशांना व्हॉट्सअॅप चॅटबॉट सर्व्हिस देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. प्रवाशी प्रवास करताना फक्त पीएनआर नंबर वापरून आपल्या जागेवर आवडीचे पदार्थ मागवू शकतात. यासाठी कोणतंही अॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही.
व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही पुढच्या स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरू शकता. व्हॉट्सअॅपवर युजर्स रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग देखील करू शकतात तसेच फीडबॅक देऊ शकतात. तसेच ऑर्डरशी संबंधित माहिती मिळवू शकतात. या सुविधेमुळे प्रवाशांना रेल्वे पँट्री आणि अन्य विक्रेत्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊयात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रेल्वेत आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकता.