ऑर्डर केला ऑनलाईन Laptop, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला जोरदार झटका

ऑनलाईन लॅपटॉप मागवला खरा पण जेव्हा त्याने बॉक्स ओपन केला तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसला.

शैलेश मुसळे | Updated: Oct 25, 2022, 06:12 PM IST
ऑर्डर केला ऑनलाईन Laptop, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला जोरदार झटका title=

मुंबई : ऑनलाईन प्रोडक्ट मागवल्यानंतर फसवणूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अनेक जणांना असाच फटका बसला आहे. त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर करताना काळजी घेतली पाहिजे. Flipkart Big Diwali Sale मध्ये एका व्यक्तीने गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता. पण जेव्हा त्याने बॉक्स उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्या बॉक्समध्ये लॅपटॉप नाही तर एक मोठा दगड होता.

सणासुदीचा हंगामात शॉपिंग वेबसाईटकडून (online offers) अनेक ऑफर दिल्या जातात. दिवाळीच्या दरम्यान फ्लिपकार्ट कडून (Flipcart) देखील सेल सुरु होता. याचा फायदा घेण्यासाठी कर्नाटकातील मंगळूर येथे राहणाऱ्या चिन्मय नावाच्या व्यक्तीने गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता. पण जेव्हा पार्सल घरी आलं तेव्हा ते उघडल्यानंतर त्याला धक्काच बसला. कारण यामध्ये संगणकाचे काही जुने भाग आणि काही ई-कचरा होता.

मंगलोरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. ट्विटवरून मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मयने 15 ऑक्टोबर रोजी तिच्या मित्रासाठी Asus TUF गेमिंग F15 गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला आणि 20 ऑक्टोबर रोजी पार्सल आलं.

ट्विटनुसार, हे फ्लिपकार्ट प्लस अॅश्युअर्ड उत्पादन होते पण तरीही या उत्पादनासोबत ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय उपलब्ध नव्हता. बॉक्स बाहेरून चांगला दिसत होता, त्यामुळे पार्सल घेऊन त्याने डिलिव्हरी बॉयला ओटीपी सांगितला.

दगड काढल्यानंतर पीडित व्यक्तीने तक्रार केली. विक्रेत्याने विनंती मान्य केली नाही. जेव्हा फ्लिपकार्टने विक्रेत्याशी संपर्क साधला तेव्हा विक्रेत्याने हे सत्य स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की उत्पादन योग्यरित्या पाठवले गेले आहे. पण नंतर त्याने ट्विटरवर ही गोष्ट शेअर केल्यानंतर फ्लिपकार्टकडून त्याला पैसे रिफंड मिळाल्याचं त्याने सांगितले आहे.