मतदार सुट्टीत बाहेरगावी गेल्याने पराभव : भाजप मंत्री

देशात चार लोकसभा आणि १० विधानसभेच्या पोट निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2018, 01:38 PM IST
मतदार सुट्टीत बाहेरगावी गेल्याने पराभव : भाजप मंत्री title=

लखनऊ : देशात चार लोकसभा आणि १० विधानसभेच्या पोट निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला. केवळ दोन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असताना तेथे एकही जागा जिंकता आलेली नाही. याबाबत भाजप मंत्र्यांनी अजब उत्तर दिलेय. आमचे मतदार उन्हाळी सुट्टीनिमित्त मुलांसोबत बाहेर गावी गेलेत. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्कराला लागल्याचा दावा, मुख्यमंत्री आदिनाथ योग्य सरकारमधील अल्पसंख्यांक कल्याण मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांकडून भाजपने सपाटून मार खाल्ला. आपल्या पराभवाची अजब कारणे भाजप आता देत सुटलाय. उत्तर प्रदेशमधील कैरानामध्ये झालेल्या लोकसभा आणि नुरपूरमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे मोदी आणि योगी सरकारला योग्य तो इशारा देण्यात विरोधक यशस्वी झालेत. असे असले तरी भाजप आपला पराभव मान्य करण्यास राजी नाही. आमचे मतदार सुट्टीत मुलांसोबर बाहेर गावी केल्याचे भाजपने म्हटलेय. त्यामुळे या उत्तराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

 भाजप मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी पराभवाचे खापर सुट्टीवर फोडलेय. एएनआयशी या वृत्तसंस्थेशी बोलताना लक्ष्णी नारायण चौधरी यानी धक्कादायक विधान केले. ‘पोटनिवडणूक आणि लोकसभा-विधानसभा निवडणूक यामध्ये फरक आहे. पोटनिवडणुकीपेक्षा लोकसभा-विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मतदार मतदान करतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आमचे समर्थक आणि मतदार फिरायला बाहेरगावी गेल्याने भाजपचा दोन्ही जागेवर पराभव झाला,’ असे वक्तव्य लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केलं आहे.