नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट टीम इंग्लंडमध्ये टेस्ट सीरीज खेळण्याच्या तयारीत आहे. ही टेस्ट सीरीज इंग्लंड, आयरलँड आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. या दौऱ्यासाठी पाकिस्तानी टीमच्या खेळाडूंसाठी, लाहौरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ट्रेनिंग कॅम्प लावण्यात आला आहे. ट्रेनिंग कॅम्पसाठी आलेला पाकिस्तानचा वेगवान बॉलर हसन अली वाघा बॉर्डरला फेरफटका मारायला पोहोचला, पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली शनिवारी सायंकाळी म्हणजे २१ एप्रिल रोजी वाघा बॉर्डरवर आपल्या वाह्यातपणामुळे सर्वांना निराश केलं. या पाकिस्ताने खेळाडून वाघा बॉर्डरवर विचित्रपणा केला.
वाघा बॉर्डरवर शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे झेंडा उतरवण्याचा रंगारंग कार्यक्रम सुरू होता. या समारोहादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीने पाकिस्तानच्या बाजूकडून भारतीय बीएसएफ जवानांना आणि भारतीय दर्शनकांना इशारे केले.
..@RealHa55an does his signature celebration move in front of Indian soldiers at Wahga Border pic.twitter.com/cN832ldHBd
— ARY Sports (@ARYSports_Web) April 21, 2018
हसन अली ज्या प्रमाणे क्रिकेटच्या मैदानात विकेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त करतो, त्याच स्टाईलमध्ये त्याने बॉर्डरवर इशारे केले. हसन अलीने हे इशारे तेथे बसलेल्या भारतीयांकडे आणि बीएसएफ जवानांकडे बघून केले.
हसन अली इशारे करत असताना, त्या रस्त्यावरून चालत होतो, ज्या ट्रॅकवर पाकिस्तानी सैनिक परेड करत होते. तो गेटच्या आणखी जवळ आला आणि त्याने तसेच इशारे केले, जसे तो क्रिकेटच्या मैदानात विकेट घेतल्यानंतर करतो.
पाकिस्तानच्या सीमेकडून समारोहात अचानक घुसून आलेल्या पाकिस्तानी क्रिकेटर बद्दल, भारताच्या बीएसएफने गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रोटोकॉलनुसार समारोहात भारताची बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स सामिल होवू शकतात. बीएसएफने या विषयी प्रोटोकॉल मोडल्याची तक्रार दाखल केली आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान एक गाव आहे, ज्याला वाघा बॉर्डर म्हणतात. येथेच दोन्ही देशांमध्ये एक गेट लावण्यात आलं आहे. हे गेट भारताच्या बाजूने अमृतसर तर पाकिस्तानकडून लाहौरच्या बाजून आहे.