Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग

सर्व लोकांसाठी पॅन कार्ड (Pan Card ) तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) असणे गरजचे आहे.  

Updated: Dec 19, 2020, 03:09 PM IST
Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग title=

मुंबई : सर्व लोकांसाठी पॅन कार्ड (Pan Card ) तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) असणे गरजचे आहे. एखाद्या व्यक्तीसाठी ते खूप महत्वाचे आहे. या दोन कार्डांशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. आधार कार्डच्यामदतीने काही मिनिटांत ई-पॅन देण्यात येत आहे. पॅनकार्ड बनवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतात.

पॅन कार्ड म्हणजे काय?

पॅनकार्डचा १० अंकी क्रमांक असून तो आयकर विभागाद्वारे ((Department of Income Tax) जारी केला जातो. आज, सर्वात प्रथम जानून घेऊया कोणत्या कार्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे आणि आपल्याला घरून Pan Card कसे प्राप्त करता येईल.

आपल्याला त्वरित ई-पॅन कार्ड मिळेल

प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) म्हणण्यानुसार इन्स्टंट पॅन सुविधेअंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड मिळण्यास सुमारे १० मिनिटे लागतात. या सुविधेअंतर्गत आतापर्यंत सुमारे सात लाख पॅनकार्ड (Pan Card) देण्यात आली आहेत.

मोफत पॅन कार्ड बनविता येते

पॅनकार्ड (Pan Card) एनएसडीएल (NSDL) आणि यूटीआयटीएसएलद्वारे (UTITSL) देखील दिले जाते. परंतु या दोन्ही संस्था या सुविधेसाठी काही शुल्क आकारतात. दुसरीकडे, जर आपण आयकर विभाग पोर्टलद्वारे पॅन कार्डसाठी मागणी केली तर आपल्याला कोणतीही फी देण्याची गरज नाही.

पॅन कार्ड पीडीएफ स्वरूपात मिळेल

पॅन कार्डसाठी अर्ज करणार्‍याला पीडीएफ स्वरूपात पॅन कार्ड मिळेल. यात क्यूआर कोड असेल. यात आपले नाव, जन्म तारीख, फोटो इत्यादी महत्वाची माहिती असेल. आपल्याला आपला ई-पॅन डाउनलोड करावा लागेल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला १५ अंकी एक्नॉलेजमेंट क्रमांक मिळेल. तुमच्या पॅनकार्डची सॉफ्ट कॉपी तुमच्या मेल आयडीवरही पाठविली जाईल.

पॅनकार्ड विनामूल्य मिळविण्याचा हा पर्याय

१. सर्वप्रथम, https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा.

२. येथे डाव्या बाजूला तुम्हाला आधारद्वारे इन्स्टंट पॅनचा (Instant PAN through Aadhaar ) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

३. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल जिथे आपल्याला गेट न्यू पॅनचा पर्याय (Get New Pan) दिसेल. यावरही क्लिक करा

४. आता नवीन पानावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक( (Aadhaar Card Number) देण्यास सांगितले जाईल. आपला आधार क्रमांक येथे प्रविष्ट करा आणि 'आय कन्फर्म' (I Confirm)टिक करा.

५. आपल्या नोंदणीकृत मोबाइल फोनवर ओटीपी (OTP ) येईल. साइटवर तो टाकून व्हेरिफाय करा.