'राहुल गांधींनी श्रावणात मटण खाल्लं, हेच का खरे जनेयुधारी ब्राह्मण"

जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव (Jan Adhikar Party chief Pappu Yadav) यांनी भाजपा नेते सुशीलकुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुशीलकुमार मोदी यांनी लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात मटण खाल्ल्याने टीका केली होती.   

शिवराज यादव | Updated: Sep 5, 2023, 05:42 PM IST
'राहुल गांधींनी श्रावणात मटण खाल्लं, हेच का खरे जनेयुधारी ब्राह्मण" title=

बिहारमध्ये सध्या श्रावणावरुन नेते भिडल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात मटण खाल्ल्याने भाजपा नेते सुशीलकुमार यादव यांनी टीका केली होती. यानंतर जन अधिकार दलाचे प्रमुख पप्पू यादव यांनी प्रत्युत्तर दिलं असून, उपहासात्मक टीका केली आहे. "सुशीलभाई, तुमचा मोबाईल तपासून घ्या. तुम्ही श्रावणात पॉर्न पाहिलं की नाही हे जरा पाहा," अशी टीका त्यांनी केली आहे. 

लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी राहुल गाधींसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मटण शिजवून राहुल गांधींना वाढलं होतं. यावरुन सुशीलकुमार मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली.

"सुशीलभाईंना फक्त विचारा की, ते मंगळवार, बुधवार आणि श्रावणात मांसाहार करणं बंद करणार का? नेते पॉर्न पाहणं बंद करतात का? ते नॉन-व्हेज नाही का? मद्यपान करणं हेदेखील नॉन-व्हेज नाही का? जातीच्या आधारे दुजाभाव करणं हेदेखील नॉन-व्हेज नाही का? सुशीलभाई तुमचा मोबाईल तपासून घ्या आणि तुम्ही श्रावणात पॉर्न पाहता की नाही हे तपासा," असं पप्पू यादव पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

लालूप्रसाद यांच्यावर ताशेरे ओढत सुशीलकुमार मोदी यांनी सोमवारी 'श्रावण'च्या पवित्र महिन्यात लालूंनी मटण खाल्लं असून, पुढील निवडणुकीत त्यांच्या राजकीय पापांची शिक्षा भोगावी लागेल, असं म्हटलं होतं. "राजद नवीन संसदेचा चेहरा पाहू शकणार नाही," अशी टीका त्यांनी केली होती. 

विरोधी गट भारताची तिसरी बैठक मुंबईत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने 2 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांच्यात झालेल्या डिनर बैठकीचा व्हिडिओ पोस्ट केला होता. डिनर बैठकीत लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींना बिहारचे खास ‘चंपारण मटण’ शिजवायला शिकवले. "लालूजी हे (स्वयंपाक) चॅम्पियन आहेत, म्हणून मला वाटले की मीदेखील शिकेन," असं राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओत म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांच्या मेजवानीसाठी लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांचं कुटुंबही होतं, आरजेडीच्या खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी लालूप्रसाद यादव यांनी जेवणासह, राजकारण, छंद अशा वेगवेगळ्या गोष्टींवर गप्पा मारल्या.