मुलगी गर्भवती झाली म्हणून आई आणि भावाने फरफटत जंगलात नेलं अन्...; घटनाक्रम पाहून पोलीसही हादरले

मुलगी लग्नाआधीच गर्भवती असल्याचं समजताच जन्मदाते कुटुंबीय तिला ओढत जंगलात घेऊन गेले. यानंतर त्यांनी तिच्यावर पेट्रोल टाकत पेटवून दिलं.   

शिवराज यादव | Updated: Sep 29, 2023, 01:39 PM IST
मुलगी गर्भवती झाली म्हणून आई आणि भावाने फरफटत जंगलात नेलं अन्...; घटनाक्रम पाहून पोलीसही हादरले title=

उत्तर प्रदेशात जन्मदात्या कुटुंबीयांनीच आपल्या मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हापूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. आपली 23 वर्षांची मुलगी लग्नाआधीच गर्भवती असल्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला होता. यानंतर ते तिला जंगलात घेऊन गेले आणि अंगावर पेट्रोल ओतून जाळून टाकलं. पण सुदैवाने मुलगी वाचली आहे. पण ती गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी तरुणीच्या आई आणि भावाला ताब्यात घेतलं आहे. 

नावाडा खुर्द गावात ही घटना घडली आहे. आगीत होरपळल्याने मुलगी 70 टक्के भाजली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यादरम्यान पोलिसांनी तरुणीच्या आईला आणि भावाला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी अविवाहित असून एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. हा तरुण तिच्याच गावात राहतो. प्रेमसंबंधातून मुलगी गर्भवती झाली होती. जेव्हा कुटुंबाला मुलगी लग्नाआधीच गर्भवती असल्याची माहिती मिळाली तेव्हा ते संतापले होते. 

28 सप्टेंबरला गुरुवारी पीडित तरुणीची आई आणि भाऊ तिला जवळच्या जंगलात घेऊन गेले. यावेळी त्यांनी तिच्यावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून टाकलं. पण सुदैवाने मुलीचा जीव वाचला आहे. पण आगीत होरपळल्याने ती 70 टक्के जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (हापूर) राजकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई आणि भावाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.