तन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे

Updated: Jun 27, 2018, 11:04 AM IST
तन्वी सेठला पाच हजारांचा दंड, पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता  title=

लखनऊ : लखनऊमध्ये आंतरधर्मिय विवाहामुळे पासपोर्ट नाकारण्यावरून झालेल्या वादानंतर प्रकाशझोतात आलेल्या तन्वी सेठ यांचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या अहवालात तन्वी या गेल्या १० वर्षांपासून नोएडामध्ये राहत असल्याचं उघड झालंय. लखनऊ पोलिसांनी याबाबतचा अहवाल विभागीय पारपत्र कार्यालयाला पाठवला होता. या अहवालाचा आधार घेत तन्वी सेठ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचं समाधानकारक उत्तर न मिळल्यास पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे. तसंच तन्वी यांच्या पतीचाही पासपोर्टही रद्द होण्याची शक्यता आहे. 

पासपोर्ट हवा असेल तर तन्वी सेठ यांच्या मुस्लिम पतीला धर्म बदण्याचा सल्ला विकास मिश्रा या अधिकाऱ्यानं दिल्याचा आरोप या जोडप्यानं केला होता. यावरून बरंच वादळही उठलं. 

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यात लक्ष घालून त्यांना पासपोर्ट मिळवून दिला आणि मिश्रा यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली होती.