मुंबई : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रिटेलिंग साम्राज्याला आता आणखी एका आध्यात्मिक गुरूकडूनच टक्कर दिली जाणार आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाऊंडर श्री श्री रविशंकर हे लवकरच आयुर्वेदिक टूथपेस्ट आणि साबण विकण्यासाठी जवळपास १ हजार रिटेल स्टोर्स उघडणार आहेत. तसेच ते क्लिनीक आणि ट्रीटमेंट सेंटरची सुरू करणार असून यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.
बाबा रामदेव यांची पतंजली ही संस्था कन्झ्य़ूमर इंडस्ट्रीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यंना टक्कर देत आहे. अशात आता श्री श्री रविशंकर हे त्यांना टक्कर देण्यासाठी समोर येत आहेत. श्री श्री यांच्या सुरुवातीच्या प्रॉडक्ट्स लिस्टमध्ये टूथपेस्ट, तूप आणि कुकीज यांचा समावेश असेल. श्री श्री आयुर्वेद ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कटपिटिया म्हणाले की, ‘लोक आता आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिकचा वापर करत आहेत. आणि आम्हाला असं वाटतं की, आमची ब्रॅंड ऑफरिंग सध्याच्या कंपन्यांपेक्षा वेगळे आहे’.
श्री श्री यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आधीपासून ड्रिंक्स, साबण, मसाल्यांची विक्री करत आहेत. आता या ट्रस्टद्वारे ३०० पेक्षा जास्त प्रॉडक्ट्सची बाजारात आणाले जाणार आहेत. कटपिटिया म्हणाले की, ‘कुणाशीही स्पर्धा करणे हा आमचा उद्देश नाही. उलट आम्हाला आयुर्वेदाचे मार्केट वाढवायचे आहे’.
पतंजली एका दशकापेक्षाही कमी वेळात १० हजार कोटी रूपयाची कंपनी झाल्याने बहुराष्ट्रीय कंपन्याना हर्बल सेक्टरमध्ये लक्ष देणे भाग पडत आहे. त्यामुळे आता श्री श्री यांच्या ट्रस्टकडून तेच प्रॉडक्ट बाजारात आणले जात असल्याने या दोघांमध्ये स्पर्धा होणार असे बोलले जात आहे.