भारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला होऊ शकतो - बी. एस. धनोआ

पठाणकोट हल्ल्यासारखाच हल्ला पून्हा एकदा होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वर्तवली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 10, 2017, 12:18 AM IST
भारतात पुन्हा पठाणकोटसारखा हल्ला होऊ शकतो - बी. एस. धनोआ  title=
File Photo

बंगळुरु : पठाणकोट हल्ल्यासारखाच हल्ला पून्हा एकदा होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वर्तवली आहे.

बंगळुरुमध्ये आयोजित एका कार्यक्रमात धनोआ यांनी म्हटलं की, पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याप्रमाणेच पूढे ही भारतीय सैन्यावर तसेच हल्ले होऊ शकतात. पाकिस्तान नव्या ठिकाणी हल्ला करुन आपल्याला धक्का देऊ शकतात.

सिमेपलीकडून आलेले दहशतवाद्यांनी पठाणकोट वायुसेनेच्या ठिकाणावर दोन जानेवारी २०१६ रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते तर १० दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश आलं होतं. 

भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतर हवाई दलाने आपली सुरक्षा क्षमता वाढवली आहे. तसेच अशा प्रकारच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी हवाई दलातर्फे सैन्याला खास प्रशिक्षण दिलं आहे. तसेच आता कुठल्याही क्षणी सूचना मिळाल्यावर आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटलं.