'मॉडर्न रावण' म्हणून इम्रान खान यांच्या रुपातल्या पुतळ्याचं दहन

स्थानिक जनतेमध्ये पाकिस्तानकडून आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा राग आहे

Updated: Oct 9, 2019, 08:41 AM IST
'मॉडर्न रावण' म्हणून इम्रान खान  यांच्या रुपातल्या पुतळ्याचं दहन title=

अमृतसर : अमृतसरमध्येही विजयदशमीचा उत्साह पाहायला मिळतोय. सोबतच पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापतींचा निषेधही नागरिकांनी नोंदवला. यंदा विजयादशमीच्या निमित्तानं 'मॉर्डन रावण' म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो असलेलं पोस्टर जाळण्यात आलं. तसंच रावणाच्या पुतळ्याला इम्रान खान यांचा फोटो असलेलं पोस्टर चिकटवण्यात आलं आणि या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तसंच लोकांनी पाकिस्तानचे सेनाप्रमुख कमर जावेद बाजवा यांचा फोटोही पुतळ्यावर चिटकावत त्यांच्या चेहऱ्याला काळं फासलं. 

स्थानिक जनतेमध्ये पाकिस्तानकडून आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून दहशतवादाला खतपाणी घालण्याचा राग आहे. त्यामुळे, त्यांनी आपला राग अशा पद्धतीनं व्यक्त केला.  


इम्रान खानरुपी पुतळ्याचं दहन

 

दुसरीकडे, नेहमीच भारताविरुद्ध गरळ ओकणारे पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट करून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. 'पाकिस्तान, हिंदुस्तान आणि इतर भागांत राहणाऱ्या सर्व हिंदुंना दसऱ्याच्या शुभेच्छा' असं ट्विट त्यांनी केलं. यावर 'हॅप्पी दसरा पाकिस्तानी रावण' असं ट्विट करून ट्विटरवासियांनी त्यांना चांगलंच निशाण्यावर घेतलं.